मराठा आरक्षणावर सरकारचा पराभव! काय बोलणार मुख्यमंत्री आज रात्री ८.३० वाजता? 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ५ एप्रिल रोजी, रात्री ८.३०  वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. तेव्हा ते मराठा आरक्षणाच्या अपयशामागील काय कारणे आहेत? त्यावर काय उपाय आहेत? यावर भाष्य करतील, अशी शक्यता आहेत. 

70

फडणवीस सरकारने दिलेले मराठा आरक्षण उद्धव ठाकरे सरकारच्या काळात न्यायालयात गेले, त्यावर ठाकरे सरकारने न्यायालयीन लढ्यात बरीच व्यूहरचना रचली, मात्र तरीही सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण रद्द करण्यात आले. हे राज्य सरकारचे अपयश आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर त्याआधी अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी याला फडणवीस कारणीभूत आहेत, त्यांनी जेव्हा हा कायदा बनवला, तेव्हा हे आरक्षण कायद्याच्या दृष्टीने फुलप्रूफ आहे, असे म्हटले होते मग हा सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण का टिकले नाही, असे म्हणाले.

आरक्षणाच्या अपयशामागील कारणमीमांसा करणार का? 

सध्या याविषयावर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राज्यभर मराठ्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर पसरला आहे. सकाळपासून राज्यभर ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. एका बाजूला राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव  वाढलेला असताना दुसरीकडे मात्र  मराठा समाजाच्या संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत, त्यामुळे या सर्व परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ५ एप्रिल रोजी, रात्री ८.३०  वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. तेव्हा ते मराठा आरक्षणाच्या अपयशामागील काय कारणे आहेत, त्यावर काय उपाय आहेत. यावर भाष्य करतील, अशी शक्यता आहेत.

(हेही वाचा : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिका ‘राष्ट्रवादी स्पॉन्सर्ड’… फडणवीसांचा आरोप!)

अदर पूनावालांना धमकी कुणी दिली? 

सध्या जरी १८ वयापेक्षा अधिक वयोगटातील समाजघटकांसाठी लसीकरण सुरु केले तरी, लसींचा तुटवडा आहे. त्यामुळे लसीकरण बंद आहे. त्यावर सरकारप्रति नाराजीचा सूर आहे. त्यामुळे लसीकरण कधी सुरळीत होणार, कोव्हीशील्ड लसीचे उत्पादक, सीरमचे अध्यक्ष अदर पूनावाला हे इंग्लंडला का गेले, त्यांना धमकी कोणी दिली, याचाही खुलासा मुख्यमंत्री करतील, अशी शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.