-
खास प्रतिनिधी
खारघर-तळोजाचा मुंब्रा करण्याचा घाट घातला जात आहे का? असा उद्विग्न सवाल भाजपाचे आमदार प्रशांत रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी विधानसभेत विचारला.
परवानगी ५०,००० उपस्थिती ३ लाख
ठाकूर यांनी विधानसभेत एका लक्षवेधीच्या माध्यमातून एका महत्वाच्या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ठाकूर यांनी खारघरमध्ये (नवी मुंबई) इज्तेमासाठी ५८ दिवसांची परवानगी दिली कशी? अशी धक्कादायक माहिती दिली. ते म्हणाले, “अंजुमन मदरसा अरेबिया इस्लामिया कासीमुल उलुम हक्कानिया मशीद’ या संस्थेने हा इज्तेमा भरवण्यासाठी ४ डिसेंबर ते ३० जानेवारी अशी ५८ दिवसांची परवानगी मागितली होती आणि अगोदर सिडकोने ती दिलीही होती. या संस्थेने सिडकोला लिहिलेल्या पत्रात ५० हजार लोक उपस्थित राहतील, असे म्हटले होते. प्रत्यक्षात ३ लाखांपेक्षा अधिक लोक उपस्थित राहिले. शिवाय ३०० स्वयंसेवक वाहतूक कोंडी रोखण्यासाठी, ३०० साफसफाई, ३०० सुरक्षेसाठी, असे एकूण १,२०० स्वयंसेवक तैनात करण्याची ग्वाही त्यांनी दिली होती, अशी धक्कादायक माहिती ठाकूर यांनी शुक्रवारी २१ मार्च २०२५ या दिवशी विधानसभेत दिली. (Kharghar Taloja)
(हेही वाचा – पुणे शहरातील रस्त्यांच्या कामांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’; मंत्री Uday Samant यांची माहिती)
१५ मिनिटांत तो दगावला
ठाकूर पुढे म्हणाले, इज्तेमा आयोजनाच्या ठिकाणी उत्सव चौकात शिवकुमार शर्मा यांना हेल्मेटने मारहाण करण्यात आली. त्या ठिकाणी ना वाहतूक पोलीस हजर होते, ना आयोजकांचे स्वयंसेवक. पोलीस चौकीत जाऊन शर्मा यांनी तक्रार देण्याचा प्रयत्न केला. पण पुढच्या १५ मिनिटांत तो दगावला. त्यांना इतकी जबर मारहाण होत असताना, स्वयंसेवकांपैकी कोणीच मदतीला का आला नाही. कार्यक्रमाच्या आयोजकांची ही जबाबदारी होती, त्यांनी ती पार पाडली नसल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी ठाकूर यांनी केली.
कायद्याला कुठलेही स्थान नाही
“खारघरमध्ये ज्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला जातोय त्या ठिकाणी आता अनेक अनधिकृत मशिदी उभ्या रहात आहेत. या ठिकाणी हॉटेल्स, बेसमेंटमध्ये नमाज पठनासाठी विविध सुविधा दिल्या जात आहेत. रेल्वेमध्ये जाहिरात केली जाते आहे आणि लोकांना ‘इथे नमाज पठनासाठी या’ आवाहन केले जात आहे,” असे सांगून ठाकूर पुढे म्हणाले, “आता या खारघर, तळोजा परिसराचे मुंब्रा करण्याचा घाट घातला जातोय. या सगळ्या प्रयत्नांचा हा भाग बनला जात आहे, इथे कायद्याला कुठलेही स्थान नाही अशी स्थिति निर्माण होते आहे. त्यामुळे मुंबईतून खारघरला जाऊन कार्यक्रम आयोजित करणार. ते जर नियम पाळणार नसतील तर अशा संस्थांना भविष्यात परवानगी देण्यात येऊ नये,” अशी मागणी ठाकूर यांनी केली. (Kharghar Taloja)
(हेही वाचा – लाडक्या बहिणींना २१०० रूपये कधी मिळणार ? Eknath Shinde यांनी सांगितलं …)
प्रथा पडेल
अशी ५८ दिवसांची परवानगी एका धार्मिक संस्थेला एका मैदानांसाठी दिली गेली तर ही प्रथा राज्यात सगळीकडे वापरली जाईल, राज्य शासनाने याबाबत विचार केला पाहिजे, असे मत तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी व्यक्त केले.
परवानगी तपासणार
गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी या विषयावर उत्तर देताना स्पष्ट केले की, पनवेल महापालिका हद्दीतील सिडकोच्या कार्पोरेट पार्क येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमाला सिडकोकडून देण्यात आलेली परवानगी तपासण्यात येईल. ही परवानगी किती कालावधीसाठी देण्यात आली, याची तपासणी करण्यात येईल. राज्यात यापुढे जास्त कालावधीसाठी सुरू असणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्याविषयी दक्षता घेण्यात येईल, असे आश्वासन कदम यांनी दिले. (Kharghar Taloja)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community