Akshata Tendulkar यांच्या विरोधात मुस्लिमांनी दिलेल्या तक्रारी मागील हे आहे का कारण?

409
Akshata Tendulkar यांच्या विरोधात मुस्लिमांनी दिलेल्या तक्रारी मागील हे आहे का कारण?

दादर सेनापती बापट मार्गावरील पहाटेच्या वेळी भाजी विक्रेत्यांचे ट्रक आणि टेम्पो इमारती आणि सोसायटीबाहेर लावल्यामुळे नागरिकांच्या तक्रारीनुसार जाब विचारायला गेलेल्या भाजपाच्या माहिम दादर विधानसभा अध्यक्षा अक्षता तेंडुलकर यांच्या विरोधातच आता मुस्लिम बांधवांनी पोलिसांत तक्रारी नोंदवायला सुरुवात केली. मात्र, अक्षता तेंडुलकर (Akshata Tendulkar) यांनी मागील काही दिवसांपासून मुस्लिम फेरीवाल्यांविरोधातील मोहिम राबवण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार, दादर भागातील भाडोत्री मुस्लिम फेरीवाल्यांना यापुढे व्यावसाय करण्यास पूर्णपणे मज्जाव करणार होत्या, केवळ मूळ फेरीवाला मुस्लिम बांधवालाच व्यवसाय करण्यास दिला जाणार होता, याबाबतच्या चर्चा दादरमधील फेरीवाल्यांमध्ये असल्याने त्यांना रोखण्यासाठीच त्यांच्या विरोधात या प्रकरणाच्या अनुषंगाने पोलिसांत एफआयआर नोंदवण्यास भाग पाडले असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा – फरार गुप्ता बंधूंशी ठाकरेंचे व्यावसायिक संबंध; Sanjay Nirupam यांचा आरोप)

वाहनामुळे होणारी लोकांची गैरसोय हा प्रश्न पडला बाजूला

माहिम दादर विधानसभा क्षेत्राच्या भाजपा अध्यक्षा अक्षता तेंडुलकर (Akshata Tendulkar) या दादर सेनापती बापट मार्गावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोडी आणि स्थानिक रहिवाशांची होणारी गैरसोय या प्रकारामुळे झारापकर च्या पुढील भागांमध्ये वाहतूक पोलिसांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि तेंडुलकर यांच्यामध्ये बाचाबाची झाली असून यामध्ये फेरीवाले आणि त्यांच्या वाहनामुळे होणारी लोकांची गैरसोय हा प्रश्न बाजुला पडला आणि या बाचाबाचीचे पर्यावसान धार्मिक मुद्दयावर झाले आहे.

त्यानंतर तेडुलकर यांच्या विरोधात तीन तक्रार अर्ज

त्यामुळे अक्षता तेंडुलकर यांनी वाहतूक पोलिसा विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी अर्ज दिला. परंतु या तक्रार अर्जानंतर खुद्द वाहतूक पोलिस सय्यदा यांनी तेंडुलकर यांच्या विरोधात तक्रार अर्ज शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात दिला. तसेच त्यानंतर दोन मुस्लिमांनी तेंडुलकर यांच्या विरोधात तक्रार अर्ज शिवाजी पार्क पोलिसांत दिला.

(हेही वाचा – Supreme Court : शंभू सीमा अर्धवट उघडण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश)

मूळ मुस्लिम फेरीवाले असतील त्यांना विरोध नसेल

त्यामुळे एका पाठोपाठ असे तीन तक्रार अर्ज तेंडुलकर यांच्या विरोधात पोलिसांत दिले आहे. मात्र, याबाबत दादरमधील फेरीवाल्यांमध्ये वेगळीच चर्चा ऐकायला मिळत असून मागील काही दिवसांपासून तेंडुलकर यांनी मुस्लिम फेरीवाल्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली होती आणि येणाऱ्या दिवसांमध्ये भाडोत्री मुस्लिम फेरीवाल्यांना बसण्यास पूर्णपणे मज्जाव केला जाणार होता. सन २०१४च्या महापालिकेच्या सर्वेमध्ये जे मुस्लिम मूळ फेरीवाले असतील त्यांना विरोध नसेल तर मूळ फेरीवाला व्यवसाय न करता भाडोत्री मुस्लिम फेरीवाल्यांना व्यावसाय करण्यास आणून त्यांनाच जागा भाड्याने देण्याचा जो प्रकार होता त्याला अक्षता तेंडुलकर (Akshata Tendulkar) यांचा विरोध होता.

(हेही वाचा – समाजवादी पक्ष महाराष्ट्रात Congress चा खेळ बिघडविणार)

तक्रारी देऊन पोलिस कारवाई अडकवून ठेवण्याचा प्रयत्न

त्यामुळे भविष्यात भाडोत्री मुस्लिम फेरीवाल्यांविरोधातील वातावरण तापण्याची शक्यता लक्षता घेता या प्रकरणाच्या आडून तेंडुलकर यांना आधीच गप्प करण्याचा प्रयत्न काही मुस्लिमांकडून सुरु झाला आहे. त्यामुळे तेंडुलकर यांच्या विरोधात तक्रारी देऊन पोलिस कारवाई अडकवून ठेवत आपला धंदा अधिक तेजीत करण्याचा प्रयत्न काही मुस्लिमांच्या म्होरक्यांनी केला आहे. त्यामुळे ज्या दोन मुस्लिमांनी तक्रारी अर्ज दिल्या आहेत, त्या मागील मुळ कारण हेच असल्याची चर्चा दादरमधील फेरीवाल्यांमधून ऐकायला येत आहे.

अक्षता तेंडुलकर यांनी घेतलेली भूमिका योग्यच

दादरमधील फेरीवाल्यांनी अक्षता तेंडुलकर (Akshata Tendulkar) यांच्या कृतीचे समर्थन केले असून रविवारी एका पायपुसणी विकणाऱ्या मराठी महिलेला काही मुस्लिम फेरीवाल्यांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे अक्षता तेंडुलकर यांनी घेतलेली भूमिका योग्यच असून जर असेच काही दिवस राहिले तरी स्टेशन परिसरात एकाही स्थानिक आणि हिंदु फेरीवाल्यांना व्यवसाय करता येणार नाही असेही फेरीवाल्यांकडून बोलले जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.