भारतीय रेल्वे दहशतवाद्यांच्या रडारवर, आयएसआयची स्लीपर सेल्स अ‍ॅक्टिव्ह

भारतीय रेल्वे दहशतवाद्यांची लक्ष्य बनली आहे. रेल्वेमध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणणार असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. आयएसआय या पाकिस्तानातील गुप्तचर संघटनेने या दहशतवादी हल्ल्याचा कट रचला आहे. आयएसआयचा घातपाती कारवायांचा हा कट उघड झाला आहे. यानंतर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

गुप्तहेर यंत्रणांनी या संदर्भात अलर्ट जारी केला. पंजाब आणि इतर आसपासच्या राज्यात रेल्वे गाड्या, रेल्वे स्थानके, रेल्वे ट्रॅक यांना दहशतवाद्यांकडून मोठा धोका असल्याचा अलर्ट देण्यात आला. आयएसआयने यासाठी स्थानिक हस्तकांना मोठ्या प्रमाणात फंडींग केले आहे. भारतातल्या आयएसआयच्या स्लीपर सेल्स अ‍ॅक्टिव्ह झाल्या आहेत. भारतीय रेल्वे याआधी ही दशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिली आहे.

(हेही वाचा बैठकीतील चर्चेवरून शरद पवारांकडून दिशाभूल! ब्राह्मण संघटनांनी केला निषेध )

2006 मध्ये घडवून आणलेला रेल्वेमध्ये घातपात 

2006 मध्ये मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. 11 जुलै 2006 रोजी मुंबईत संध्याकाळी 6.23 वाजून 11 मिनिटांच्या आत पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांच्या सात बोगींमध्ये सात सीरियल बॉम्बचा स्फोट झाला होता. ज्यामध्ये 189 प्रवासी ठार झाले होते तर 817 जण जखमी झाले होते. माटुंगा रोड, माहीम, वांद्रे, खार रोड, जोगेश्वरी, बोरिवली आणि मीरा रोड स्थानकावर हे सात मालिका बॉम्बस्फोट झाले होते. गर्दीची ठिकाणे ही नेहमीच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर राहिली आहे. मुंबईवर देखील अनेकदा दहशतवादी हल्ले झाले. मुंबईच्या लोकल या नेहमीच गर्दीचं भरलेल्या असतात. त्यामुळे मुंबईवर देखील नेहमी दहशतवादी हल्ल्याचे सावट असते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here