इस्त्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू (Benjamin Netanyahu) यांच्या सिझेरिया शहरातील खासगी निवासस्थानाला ड्रोनने लक्ष्य करण्यात आल्याची माहिती काही वृत्तसंस्थांनी नुकतीच दिली आहे. हमास अतिरेकी संघटनेचा म्होरक्या याह्या सिनवार याचा खात्मा केल्यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनी युद्ध थांबविण्याबाबत मोठे विधान केले होते. मात्र आता नेत्यानाहू यांच्या घरावरच हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यावेळी घरात नेत्यानाहू आणि त्यांच्या पत्नी घरी हजर नव्हत्या, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. तसेच या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नसल्याचीही माहिती मिळत आहे. (Israel-Hamas Conflict)
( हेही वाचा : Sharad Pawar आणि दाऊद यांची दुबईत भेट; प्रकाश आंबेडकरांआधी कुणी केला होता दावा?)
दरम्यान नेत्यानाहू (Benjamin Netanyahu) यांच्या घरावर आणखी दोन ड्रोन लेबनानमधून डागले गेले होते. पण हवाई दलाने ते हाणून पाडले. या हल्ल्यामुळे आता राजधानी तेल अविवमध्ये पुन्हा सायरन घुमू लागला आहे. लेबनानमधून हा ड्रोन हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. याह्या सिनवार याची हत्या केल्यानंतर दोनच दिवसांनी लेबनानकडून इस्रायलला लक्ष्य केल्याचे सांगितले जात आहे. (Israel-Hamas Conflict)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community