इराणच्या अणुकेंद्रावर हल्ले करावेत; Donald Trump यांचा इस्रायलला सल्ला

81
अमेरिकेत सध्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे, त्यातच अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि सध्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवत असलेले डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इस्रायल – इराण संघर्षावर मोठे विधान केले आहे. इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली, त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करायला हवे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

जो बायडेन यांच्यावर टीका 

डोनाल्ड ट्रम्प  (Donald Trump) यांचे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या विधानानंतर आले आहे. बायडन यांनी इस्रायल-इराण संघर्षामुळे युद्ध उद्भवण्याची शक्यता नाही. इस्रायलने प्रत्युत्तर देताना इराणच्या अणुकेंद्रावर हल्ले करू नये, असे म्हटले होते. इराणने इस्रायलवर २०० क्षेपणास्त्र डागली. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल इराणच्या अणुकेंद्रांना लक्ष्य करू शकते, याबद्दल जो बायडन यांना प्रश्न विचारण्यात आला होता. बायडन यांनी दिलेल्या उत्तरावर डोनाल्ड ट्रम्प  (Donald Trump) बोलत होते. इस्रायलने इराणच्या अणुकेंद्रावर आधी हल्ले करायला हवे, चिंता नंतर करावी, असा सल्ला ट्रम्प यांनी नेत्यान्याहू यांना दिला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.