Israeli-Palestinian conflict : पॅलेस्टिनी दहशतवाद्यांची विकृती; इस्रायलच्या महिला सैनिकाची काढली विवस्त्र धिंड

206
पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना गाझाच्या दहशतवाद्यांनी शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये घुसखोरी केली, तसेच ५ हजार रॉकेटचा मारा केला. त्यानंतर या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या महिला सैनिकाला ठार करून तिचे कपडे काढून विवस्त्र धिंड काढली. त्याचा व्हिडिओ व्हायरल केला. या कृत्याचा जगभरातून निषेध व्यक्त होऊ लागला आहे.
यावेळी पॅलेस्टिनी दहशतवादी ‘अल्ला हू अकबर’ अशा घोषणा देत होते. विशेष म्हणजे यावेळी पॅलेस्टिनीतील अल्पवयीन मुलेही यावेळी विवस्त्र महिलेची धिंड काढताना आनंद व्यक्त करत होते.

इस्रायलकडून युद्धाची घोषणा 

यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तातडीने इस्रायलची फौज गाझाचे दहशतवादी ज्या सीमेमधून घुसखोरी करत आत आले, त्या दिशेने रवाना केले, त्यानंतर त्यांनी पॅलेस्टिनच्या विरोधात युद्ध Israeli-Palestinian conflict घोषित केले. सकाळी हमासने इस्रायल राज्य आणि तेथील नागरिकांवर अचानक खुनी हल्ला केला. पहाटेपासूनच आम्ही यामध्ये आहोत. आपण आता थेट युद्धात Israeli-Palestinian conflict आहोत, हे कोणतेही ऑपरेशन नाही किंवा कारवाई नाही, असेही बेंजामिन नेतन्याहू म्हणाले.

(हेही वाचा Israel News : हमासने इस्रायलवर 5000 हून अधिक रॉकेट डागले, इस्रायल सरकार देणार ‘असे’ प्रत्युत्तर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.