Aditya L1 : ‘आदित्य एल-1’ प्रक्षेपणासाठी तयार; ‘या’ ठिकाणी लाईव्ह पाहता येणार

177
Aditya L1 : 'आदित्य एल-1' प्रक्षेपणासाठी तयार; 'या' ठिकाणी लाईव्ह पाहता येणार

भारताची महत्त्वाकांक्षी सौर मोहीम लाँच (Aditya L1) होण्यासाठी आता फक्त काही तास उरले आहेत. उद्या म्हणजेच शनिवार, २ सप्टेंबर रोजी सकाळी ११:५० मिनिटांनी ‘आदित्य एल-1’ उपग्रह प्रक्षेपित करण्यात येईल. यासाठीचं काउंटडाऊन आजपासून सुरू झालं आहे. इस्रोने ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.

आज दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी याचा (Aditya L1) काउंटडाऊन सुरू झाला. २३ तास ४० मिनिटांचा हा काउंटडाऊन असणार आहे. आदित्यच्या प्रक्षेपणासाठी इस्रो आपलं विश्वासार्ह पीएसएलव्ही-एक्सएल हे रॉकेट वापरणार आहे.

(हेही वाचा – Special session Of Parliament : आता अधिकाऱ्यांना परवानगीशिवाय दिल्ली सोडता येणार नाही; पंतप्रधानांनी दिला आदेश)

चंद्रयान ३ नंतर आदित्य एल-१ (Aditya L1) द्वारे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) सूर्याचा अभ्यास करणार आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रो आदित्य एल – १ (Aditya L – 1) हे यान सूर्याच्या दिशेने पाठवणार आहे. या सौरमोहिमेद्वारे सूर्याचे तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर, अंतराळातील हवामान, सौरवादळे आणि त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यात येणार आहे.

इस्रोच्या (Aditya L1) अधिकृत वेबसाईटवर, अधिकृत यूट्यूब चॅनल, अधिकृत फेसबुक पेज आणि एक्स हँडलवर याचं थेट प्रक्षेपण करण्यात येईल. तुम्ही टीव्हीवर देखील या यानाचं प्रक्षेपण पाहू शकता. DD National या टीव्ही चॅनलवर हे लाईव्ह दाखवण्यात येईल. उद्या (शनिवार) सकाळी 11.20 मिनिटांनी थेट प्रक्षेपणास सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती इस्रोने आपल्या पोस्टमध्ये दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.