‘या’ विषयांवर निर्णय घेण्यास ‘ठाकरे’ सरकार अयशस्वी, मुख्यमंत्र्यांचा निशाणा

140

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, मुंबईत झालेले बॉम्बस्फोट, वीर सावरकर आणि हिंदुत्वाशी संबंधित विषयासंदर्भात निर्णय घेण्यास ठाकरे सरकार म्हणजेच महाविकास आघाडी सरकार अयशस्वी ठरले आहे, म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवारी माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

(हेही वाचा – RBI New Rule: तुमच्याकडे ‘या’ नोटा आहेत का? असतील तर त्यांची किंमत ‘शून्य’!)

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदेंनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत हल्लाबोल चढवला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्रपणे लढले होते. परंतु राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. हे सरकार स्थापन झाल्यानंतर ज्या-ज्यावेळी हिंदुत्व आणि वीर सावरकरांचा मुद्दा पुढे येत होता, त्यावेळी आम्हाला निर्णय घेता येणं शक्य झाले नाही, त्यामुळे ठाकरे सरकार संबंधित खटल्यांबाबत निर्णय घेण्यात अयशस्वी ठरल्याचा आरोप एकनाथ शिंदेंनी केला.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही काहीही बेकायदेशीर केलेले नाही, आमचे मजबूत सरकार आहे. या देशात नियम, कायदे आणि राज्यघटना आहे, त्यानुसार आम्हाला काम करायचे आहे. आज आमच्याकडे दोन तृतीयांश पेक्षा अधिक बहुमत आहे, त्यामुळे आम्ही घेतलेला निर्णय कायदेशीर आणि वैध आहे, सभापतींनी देखील आम्हाला ओळखले, आणि आमच्या विरोधात न्यायालयात धाव घेणाऱ्यांवर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत, असे ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.