Assembly Elections : अपक्ष उमेदवारांचे नशिबही फडफडणार!

मध्यप्रदेश आणि राजस्थानसह पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांच्या तोंडाला फेस आणणाऱ्या अपक्ष उमेदवारांचे नशिब फडफडण्याच्या मार्गावर आहे.

94
Assembly Elections : अपक्ष उमेदवारांचे नशिबही फडफडणार!
Assembly Elections : अपक्ष उमेदवारांचे नशिबही फडफडणार!
  • वंदना बर्वे

मध्यप्रदेश आणि राजस्थानसह पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकीत (Assembly Elections) राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांच्या तोंडाला फेस आणणाऱ्या अपक्ष उमेदवारांचे नशिब फडफडण्याच्या मार्गावर आहे. या निवडणुकीत दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या अपक्ष उमेदवारांना लोकसभेच्या निवडणुकीत भाजप आणि कॉंग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. (Assembly Elections)

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा (Assembly Elections) निकाल अद्याप यायचा आहे. येत्या रविवारी दि. ३ डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. भाजप आणि कॉंग्रेससह संपूर्ण राजकीय पक्षांचे डोळे या निकालाकडे लागून आहे. एवढेच नव्हे तर, भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी अपक्ष उमेदवारांवर आपले लक्ष्य केंद्रीत केले आहे. (Assembly Elections)

भाजप (BJP) आणि कॉंग्रेसमधील (Congress) सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी राज्यांच्या पदाधिकाऱ्यांना अशा अपक्ष उमेदवारांची यादी तयार करायला सांगितली आहे जे दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर असतील. पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे कितीतरी नेत्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आहे. (Assembly Elections)

अशात, अपक्ष उमेदवार राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना मागे ढकलून दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर येत असतील तर ते दुर्लक्ष करण्यासारखे नक्कीच नाही असे दोन्ही राष्ट्रीय पक्षांना वाटत आहे. अशा अपक्ष उमेदवारांची यादी तयार करायची आणि लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना पक्षाची उमेदवारी द्यायची अशी या पक्षांची योजना आहे. अर्थात, बंडाचे निशाण फडकवून स्वत:ची क्षमता सिध्द करणाऱ्या अपक्ष उमेदवारांना चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. या उमेदवारांना आगामी निवडणुकीत तिकीट द्यायचे किंवा पद देऊन पक्षात आणले जाणार आहे. (Assembly Elections)

(हेही वाचा – Mumbai Crime : व्याजाच्या पैशांसाठी सावकाराकडून महिलेवर अतिप्रसंग)

लोकसभेची आगामी निवडणूक भाजप (BJP) आणि विरोधी पक्षांसाठी खूप महत्वाची आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही गटाची प्रतिष्ठा पणाला लावली जाणार आहे. अशात अपक्ष उमेदवारांच्या लोकप्रियतेचा उपयोग आपल्याबाजूने करून घेण्याची योजना आहे. मध्यप्रदेशच्या बाबतीत सांगायचे झाले तर, सध्या भाजप आणि कॉंग्रेसचे असे दोन-दोन उमेदवार मैदानात आहेत ज्यांनी २०१८ मध्ये अपक्ष निवडणूक लढविली होती. यात कॉंग्रेसच्या उमेदवार डॉ. रश्मी सिंग कपिध्वज सिंग यांचा समावेश आहे. (Assembly Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.