Chhatrapati Shahu Maharaj यांचा दत्तकविधी गुप्तपणे झाला…

२४ जून १९६२ रोजी ‘न्यू पॅलेस’वर मोर्चाही काढण्यात आला होता. पोलिसांनी विरोध केल्यावर जनता खवळली, जोरदार दगडफेक झाली, पोलिस वायरलेस गाड्या जाळण्यात आल्या, लाठीमार व अश्रूधूरांचा वापर झाला. विशेष म्हणजे लोकांनी ‘न्यू पॅलेस’वर काळे निशाण लावले.

262
Chhatrapati Shahu Maharaj यांचा दत्तकविधी गुप्तपणे झाला...

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर गादीचे खरे वारसदार नसून दत्तक आहेत असे वक्तव्य केल्यानंतर काँग्रेसने त्यांच्या विधानावरून थयथयाट केला. मात्र त्यांनी केलेल्या विधानाला इतिहास साक्षीदार आहे. कोल्हापूर जनतेचा विरोध असताना मोठी गुप्तता पाळत २८ जुन १९६२ ला बेंगलोर येथे त्यांचा दत्तकविधी पार पाडला गेला, अशी माहिती समोर आली आहे. (Chhatrapati Shahu Maharaj)

‘न्यू पॅलेस’वर मोर्चाही

२४ जून १९६२ रोजी ‘न्यू पॅलेस’वर मोर्चाही काढण्यात आला होता. पोलिसांनी विरोध केल्यावर जनता खवळली, जोरदार दगडफेक झाली, पोलिस वायरलेस गाड्या जाळण्यात आल्या, लाठीमार व अश्रूधूरांचा वापर झाला. विशेष म्हणजे लोकांनी ‘न्यू पॅलेस’वर काळे निशाण लावले. कोल्हापुरात पद्माराजे सहाय्यक समितीने कडकडीत हारताळ पाळला. यामध्ये महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. तरीही हे शाहू महाराजांचे दत्तकविधान झालयाचे वृत्त कोल्हापुरात वाऱ्यासारखे पसरले, अशी माहिती देण्यात आली. (Chhatrapati Shahu Maharaj)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: मतदान करणाऱ्यांना टाटा एअरलाइन्सची विशेष ऑफर, सवलतीचा फायदा कसा घ्याल?)

दिलीपसिंहराव झाले शाहू

लोक राजवाड्यात घुसण्याचा प्रयत्न करीत होते. अशा वातावरणात एक तरुण राजवाड्याच्या टॉवरवर चढला आणि त्याने तेथील ‘भगवा झेंडा काढून त्याठिकाणी काळा झेंडा लावला’..! छत्रपती शहाजी महाराजांनी ही परिस्थिती लक्षात घेतली. आणि १२ जुलै १९६२ ला जो दत्तक विधान समारंभ व्हायचा होता. तो त्यांनी मोठ्या गुप्ततेने २८ जुन १९६२ ला बेंगलोर येथे जाऊन पार पाडला. त्यात कोल्हापूर संस्थांनचे माजी अधिपती छत्रपती शहाजी महाराज यांनी त्यांची कन्या नागपूरच्या शालिनी राजे यांचा मुलगा दिलीपसिंहराव यांना वारस म्हणून दत्तक घेतले आणि दत्तक विधाननंतर दिलीपसिंहराव यांचे नाव ‘युबराज शाहुराजे’ असे नामकरण झाले. हेच ते विद्यमान छत्रपती शाहु महाराज, असे सांगण्यात येते. (Chhatrapati Shahu Maharaj)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.