Maharashtra Congress मधील एक गट फुटीच्या मार्गावर?

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवल्याने याचे परिणाम महाराष्ट्रातील राजकारणावर होणार असून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये यामुळे अस्वस्थता वाढीस लागली आहे.

333
Maharashtra Congress मधील एक गट फुटीच्या मार्गावर?
Maharashtra Congress मधील एक गट फुटीच्या मार्गावर?

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवल्याने याचे परिणाम महाराष्ट्रातील राजकारणावर होणार असून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये यामुळे अस्वस्थता वाढीस लागली आहे. विशेषतः महाराष्ट्रात शिवसेनेतील फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट समोर आली होती. मात्र काँग्रेस पक्षात कोणतीही फूट पडली नव्हती. येत्या काही दिवसांमध्ये काँग्रेसमधील मोठा आमदारांचा गट भाजपकडे जाणार असल्याची शक्यता काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने खाजगी मध्ये बोलून दाखवली आहे. (Maharashtra Congress)

मागील विधान परिषदेच्या जून २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्रातील काँग्रेसची सात ते आठ मते फुटली होती. त्याचा फायदा भाजपचा विधानपरिषद उमेदवार निवडून आणण्यासाठी झाला होता. त्याच वेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडून राज्यातील सरकारच पाडल्यामुळे त्याकडे फारसे कुणी लक्ष दिले नाही. मात्र त्यावेळी काँग्रेसने याची चौकशी करण्यासाठी काँग्रेस नेते मोहन प्रकाश समिती नेमली होती. त्याचा अहवाल केंद्रीय नेतृत्वाला देण्यात आला होता. मात्र त्या फुटीर क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांच्या विरोधात कारवाई करण्याची हिंमत नेतृत्वाने दाखवली नाही. (Maharashtra Congress)

(हेही वाचा – World Athletics Championship 2029 : जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या आयोजनासाठी भारत उत्सुक)

आता तीन राज्यांतील जोरदार विजयानंतर त्या आमदारांसह आणखी काही मोठे नेते हे भाजपच्या गळाला लागणार असल्याची भीती काँग्रेसच्याच गोटातून व्यक्त केली जात आहे. तीन राज्यात भाजपला मिळालेल्या विजयानंतर काँग्रेस आमदारांच्या एका गटामध्ये मोठी चलबिचल दिसून येत आहे. त्यामुळेच येणाऱ्या काळामध्ये या फुटीर आमदारांचा गट भाजपमध्ये सामील होऊ शकतो. (Maharashtra Congress)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.