शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अकराव्या स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील स्मृतीस्थळावर जाऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी श्रध्दांजली वाहिली. परंतु यावेळी उबाठा गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आमने सामने आल्याने दोन्ही गटांमध्ये हमरीतुमरी झाली. परंतु उबाठा गटाचे शिवसैनिक स्मृतीदिनाच्या दिवशी तिथे उपस्थित राहतात, ते कधीही आदल्या दिवशी उपस्थित राहत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री स्मृतीस्थळावर उपस्थित राहत असताना उबाठा शिवसेनेच्या शिवसैनिक उपस्थित का राहिले असा प्रश्न आता केला जात असून जाणीवपूर्वक शिवसेनेला भिडून वातावरण तापवत स्मृतीदिनी जास्तीत जास्त शिवसैनिकांनी याठिकाणी उपस्थित राहण्यासाठी का स्टंट केला नाही ना असा सवाल आता खुद्द मुंबईकरांना पडू लागलाय. (Balasaheb Thackeray)
छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील अर्थात शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जावून गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकारी व शिवसैनिकांसह श्रध्दांजली वाहिली. परंतु मुख्यमंत्री येणार याची कल्पना असतानाही उबाठा शिवसेनेचे शिवसैनिक हे मोठ्याप्रमाणात याठिकाणी जमू लागले. त्यामुळे मुख्यमंत्री तिथून निघून गेल्यानंतर उबाठा शिवसैनिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन दोन्ही गट एकमेकांच्या अंगावर धावून गेले. परंतु पोलिसांनी हे प्रकरण योग्यप्रकारे हाताळून दोन्ही गटाला बाजुला करत रात्रीपासूनच या ठिकाणी मोठ्याप्रमाणात पोलिस यंत्रणा सज्ज ठेवली. (Balasaheb Thackeray)
एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षीही आदल्यादिवशीच स्मृतीस्थळी भेट देऊन बाळासाहेबांना श्रध्दांजली वाहिली होती. परंतु मागील वर्षी मुख्यमंत्री आले होते तेव्हा उबाठा शिवसेनेचे कोणीही पदाधिकारी तिथे फिरकले नव्हते. पण ते गेल्यानंतर काही निवडक पदाधिकारी तिथे आले आणि त्यांनी स्मृतीस्थळाच्या कामाची पाहणी करून ते निघून गेले होते. परंतु यंदाही मागील वर्षीप्रमाणे मुख्यमंत्री बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाच्या आदल्यादिवशी श्रध्दांजली वाहण्यास आले. त्यामुळे ही मंडळी श्रध्दांजली वाहून निघून जाणार होती. परंतु याची कल्पना असतानाही उबाठा शिवसेनेचे नेते अनिल देसाई आणि अनिल परब हे जाणीव पूर्वक त्याचवेळी तिथे उपस्थित राहिले. विशेष म्हणजे मागील वर्षी ही मंडळी आली तरी मोजकेच पदाधिकारी उपस्थित होते, तिथे यंदा गुरुवारी मुख्यमंत्री येणार असल्याचे माहिती झाल्याने मोठ्याप्रमाणात शिवसैनिकांची गर्दी झाली होती. या शिवसैनिकांमध्ये धारावीतील शिवसैनिकांची मोठी गर्दी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दादर माहिममधील शिवसैनिकांऐवजी धारावीमधील शिवसैनिकांना बोलावून उबाठा शिवसेनेने जाणीवपूर्वक का गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला नसेल ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Balasaheb Thackeray)
(हेही वाचा – Balasaheb Thackeray : बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला गालबोट नको; मुख्यमंत्र्यांचे आवाहन)
काही ज्येष्ठ शिवसैनिकांच्या म्हणण्यानुसार, शिवसैनिक कधीही आदल्या दिवशी तिथे जात नसतो. तो स्मृतीदिनाच्या दिवशीच जातो. आदल्या दिवशी केवळ पदाधिकारी कामाची पाहणी करण्यासाठी जात असतात. त्यामुळे एवढ्या मोठ्याप्रमाणात शिवसैनिकांची गर्दी हीच मोठी शंकेला वाव देणारी आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक हा राडा करून शिवसैनिकांच्या भावना भडकावून स्मृतीदिनी जास्तीत जास्त गर्दी करण्याचा प्रयत्न यामागे असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या दोन्ही गटातील हमरीतुमरीनंतर स्मृतीस्थळावरील गर्दी वाढलेली पहायला मिळालेली नाही. उलट दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या स्मृतीदिनी सर्वात कमी गर्दी झालेली पहायला मिळाली. (Balasaheb Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community