अलीकडेच झालेल्या दसरा मेळाव्याच्या भाषणामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी सरन्यायधीश चंद्रचूड यांच्यावर टीका केली होती. दिल्लीतील पत्रकार डी. उपाध्यय यांनी अॅटर्नी जनरल यांच्याकडे अवमान याचिका दाखल करण्याची मागणी केली आहे. (Uddhav Thackeray)
राज्यात आणि केंद्रात भाजप सत्तेत आल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप होत होता. यातच शिवसेना पक्ष फुट प्रकरणानंतर निवडणुक आयोगावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टिका केली होती. यातच दसरा मेळाव्याच्या भाषणात त्यांनी सरन्यायाधीस चंद्रचुड यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यावरून आता डी. उपाध्यय यांनी कोर्टात अवमान याचिका दाखल केली आहे. (Uddhav Thackeray)
(हेही वाचा – Manoj Jarange Patil : “मराठ्यांचे मुडदे पडायला तुम्ही जबाबदार आहात” – जरांगे पाटील यांचा वडेट्टीवारंवर गंभीर आरोप)
अशा याचिकांमुळे काहीही फरक पडत नाही – संजय राऊत
उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाची आणि सरन्यायाधीशाच्या कार्यपद्धतीची बदनामी केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. दरम्यान, अशा याचिकेमुळे काही फरक पडणार नाही, यामुळे एका सामाजिक प्रश्नाला वाचा फुटेल, असा पलटवार खासदार संजय राऊत यांनी केला आहे. (Uddhav Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community