मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी झालेल्या सभेवरुन राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी सामाजिक शांतता भंग करण्यासाठी चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एफआयआर कॉपीत म्हटले आहे. पोलिस अधिकारी गजानन फकीरराव इंगळे यांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये राज ठाकरे यांच्या भाषणातील नेमक्या कोणत्या विधानांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला याची माहिती देण्यात आली आहे.
(हेही वाचाः राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, अटक होणार?)
राज ठाकरेंनी दिला होता इशारा
औरंगाबाद खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक क्रिडा मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांची 1 मे रोजी सभा झाली. त्यावेळी त्यांच्या भाषणारम्यान शेजारील मशिदीवरुन अज़ान सुरू झाली. त्यावेळी राज ठाकरे यांनी इशारा दिला. माझी पोलिसांना नम्र विनंती आहे, माझ्या सभेच्या वेळी जर हे बांग सुरू करणार असती, तर आपण ताबडतोब तोंडात बोळा कोंबावा. यांना जर सरळ मार्गाने समजत नसेल तर त्यानंतर महाराष्ट्रात काय होईल मला माहीत नाही. त्यांना जर समजा सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊनच जाऊ दे, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी इशारा दिला होता.
(हेही वाचाः भर सभेत अज़ान सुरू झाली तेव्हा मोदींनी काय केलं?)
एफआयआर कॉपीत माहिती
माझी संपूर्ण देशवासियांना व हिंदुबांधवांना भगिनींना विनंती आहे की, पुढचा मागचा विचार करू नका. हे भोंगे उतरले गेलेच पाहिजेत. मंदिरांवर असतील तरी ते सुद्धा उतरले गेले पाहिजे पण आधी यांचे उतरल्यानंतर… आज ही परिस्थिती आहे. अभी नही तो कभी नाही. जर हे 3 तारखेपर्यंत ऐकले नाहीत तर 4 तारखेला हनुमान चालिसा मला ऐकू आलीच पाहिजे, असे विधान राज ठाकरे यांनी केले होते. याच विधानांमुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एफआयआर कॉपीवरुन समोर येत आहे.
(हेही वाचाः … तर मनसैनिक रस्त्यावर उतरतील, सरकारने तयार रहावे; मनसेचा इशारा)
Join Our WhatsApp Community