पैशानेच नाही तर पक्षाचं मत न पटल्याने देखील मतं फुटतात; Ganesh Naik यांचे सूचक वक्तव्य

215
पैशानेच नाही तर पक्षाचं मत न पटल्याने देखील मतं फुटतात; Ganesh Naik यांचे सूचक वक्तव्य
पैशानेच नाही तर पक्षाचं मत न पटल्याने देखील मतं फुटतात; Ganesh Naik यांचे सूचक वक्तव्य
मुंबई प्रतिनिधी 
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान सुरू आहे. विधानसभेतील सदस्यांच्या मतदानाच्या जोरावर हे ११ उमेदवार निवडले जाणार आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत १२ उमेदवार रिंगणात आल्याने निवडणुकीला चुरस वाढली आहे. यामध्ये कोणत्या पक्षाचे आमदार फुटणार कोणाची मते फुटणार यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच भाजपाचे (BJP) गणेश नाईक ( Ganesh Naik) यांनी मतदानाचा आपला हक्क बजावल्यानंतर “पैशाने नाही तर पक्षाची मत न पटल्याने देखील मत फुटतात” विधान केल्याने राजकीय वर्तुळात याचे तर्कवितर्क काढले जात आहेत. ( Ganesh Naik)
गणेश नाईक ( Ganesh Naik) यांच्या या विधानानंतर ते भाजपामध्ये (BJP) नाराज आहेत अशा गोष्टी आधीपासूनच बोलल्या जात होत्या. त्यामुळे भाजपाचे आमदार देखील उठू शकतात अशी शंका व्यक्त केली जात आहे. आत्ताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर गणेश नाईक ( Ganesh Naik) आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यामध्ये ठाणे लोकसभेच्या जागेसाठी रस्सीखेच पाहावयास मिळाली होती. त्यातच भाजपाच्याच (BJP) बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदा म्हात्रे (Manda Mhatre) आणि गणेश नाईक ( Ganesh Naik) यांच्यात असलेले वितृष्ट नवी मुंबईतील जनतेसाठी सर्वश्रुत आहे. बेलापूर विधानसभा हद्दीत गणेश नाईक यांच्या चिरंजीवाचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन देखील आजच असल्याचे कळते. सलग दहा वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केल्यानंतर यंदा बेलापूर मतदारसंघातून म्हात्रे यांना स्वपक्षातील गणेश नाईक यांच्या कुटुंबातूनच आव्हान उभे राहीले आहे.
राज्यात सत्ता आल्यानंतरही मंत्रीपदापासून दूर ठेवले गेल्याने नाईक ( Ganesh Naik) दुखावले गेले आहेत. लोकसभा निवडणुकीत हातातोंडाशी आलेला मुलाच्या उमेदवारीचा घास मुख्यमंत्र्यांनी ऐन वेळी हिरावून घेतला गेल्यामुळे ते नाराज असल्याचे त्यांच्या या वक्तव्यातून स्पष्ट दिसून येत आहे.
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.