महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वात कोणताही बदल नाही; BJP निवडणूक महायुतीसोबत लढणार

113
महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वात कोणताही बदल नाही; BJP निवडणूक महायुतीसोबत लढणार

भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात लढणार हे आता स्पष्ट झाले आहे. महायुतीतील प्रत्येक पक्षाला सोबत घेऊन महाराष्ट्र जिंकण्याची रणनीती ठरविली जाणार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. (BJP)

भारतीय जनता पक्ष निवडणूक मोडमध्ये आला आहे. या वर्षाच्या शेवटी महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणामध्ये विधानसभेची निवडणूक होणे आहे. राज्यातील भाजपाचे नेते सुद्धा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन संघटनेचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी राजीनामा सुद्धा हायकामांडला पाठविला होता. (BJP)

(हेही वाचा – CM Eknath Shinde: ऑटो रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी खुशखबर; सरकारकडून कल्याणकारी महामंडळ स्थापन)

हायकमांडने फडणवीस यांचा राजीनामा फेटाळून लावला आहे. एवढेच नव्हे तर, महाराष्ट्रात आता कोणताही बदल होणार नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष बदलले जातील अशीही चर्चा होती. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात आज भाजपा मुख्यालयात केंद्र आणि राज्यातील नेत्यांची बैठक झाली. यावेळी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव, महासचिव विनोद तावडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार, माजी मंत्री रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे आदी महाराष्ट्रातील नेते उपस्थिती होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विधानसभेची निवडणूक महायुतीतील सर्व पक्ष एकजुटीने लढणार आहेत. आता सर्व पक्षाशी चर्चा करून पुढची रणनीती ठरविली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (BJP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.