Maharashtra Legislative Council निवडणूक बिनविरोध?

229
Maharashtra Legislative Council निवडणूक बिनविरोध?
  • सुजित महामुलकर

विधानपरिषदेतील पाच जागांसाठी २७ मार्च २०२५ या दिवशी निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १७ मार्च २०२५ हा शेवटचा दिवस आहे. विरोधी पक्षांकडे एक उमेदवार निवडून येईल, इतकेही संख्याबळ विधानसभेत नसल्याने विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कोणत्या जागा रिक्त?

विधानपरिषदेतील ५ आमदार, आमशा पाडवी (शिवसेना-शिंदे), राजेश विटेकर (राष्ट्रवादी अजित पवार), प्रवीण दटके (भाजपा), गोपीचंद पडळकर (भाजपा) आणि रमेश कराड (भाजपा) हे विधानसभेवर निवडून गेले. त्यामुळे या पाच जागा विधानपरिषदेत रिक्त झाल्या आहेत आणि २७ मार्चला त्या जागा भरण्यासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. (Maharashtra Legislative Council)

(हेही वाचा – America तब्बल ४१ देशांच्या नागरिकांना करणार प्रवेश बंदी)

१७ मार्च शेवटचा दिवस

निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार विधानपरिषद निवडणुकीसाठी १० मार्च ते १७ मार्च दरम्यान अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पाडण्यात येईल तर मंगळवारी १८ मार्च रोजी अर्जाची छाननी होईल. २० मार्चला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल आणि २७ मार्च या दिवशी मतदान प्रक्रिया पार पडेल.

विधान परिषदेतील पक्षनिहाय संख्याबळ

विधानपरिषदेत एकूण ७८ सदस्य असतात, मात्र सध्या ५२ सदस्यच सभागृहात आहेत. त्यापैकी ३२ महायुतीचे असून त्यात भाजपाचे १९, शिवसेना (शिंदे) ६ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ७ आमदार आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे केवळ १७ आमदार असून काँग्रेसचे ७, राष्ट्रवादी (शप) ३ आणि शिवसेना उबाठाचे ७ न ३ अपक्ष सदस्य आहेत. (Maharashtra Legislative Council)

(हेही वाचा – राज्यातील १८ जिल्ह्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौरऊर्जीकरण करणार; CM Devendra Fadnavis यांची घोषणा)

मतदान कोण करतं?

विधानसभेप्रमाणे विधानपरिषद ही दर पाच वर्षांनी विसर्जित होत नाही. दर दोन वर्षांनी परिषदेतील एक-तृतीयांश सदस्य त्यांची सहा वर्षाची मुदत संपताच निवृत्त होतात. एकूण ७८ सदस्यांपैकी ३० सदस्य हे विधानसभा आमदार निवडतात. २२ सदस्य विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत निवडले जातात. ७ सदस्य पदवीधर मतदारसंघांमधून आणि ७ शिक्षक मतदारसंघांमधून निवडले जातात.

निवडणूक बिनविरोध होऊ शकते

विधानसभेत २८८ आमदार असल्याने पाच जागांवर मतदान झाल्यास निवडून येण्यास ५७ मतांचा कोटा लागेल. सध्या मविआचे एकूण ४६ आमदार असून तीनही पक्षांचा म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी (शप) आणि शिवसेना उबाठा मिळून एक सदस्यही निवडून येऊ शकत नाही, अशी परिस्थिती असल्याने परिषदेच्या पाच जागांसाठी मतदानाची वेळ येईल, याची शक्यता कमीच दिसते. विरोधी पक्षाकडून उमेदवार दिला गेला नाही तर ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी चिन्हे आहेत. (Maharashtra Legislative Council)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.