मुंबई महानगरपालिका ही सातत्याने आदित्य सेना आणि टक्केवारी गँगमुळे भ्रष्ट्राचारासाठीच चर्चेत राहिली आहे. मात्र प्रशासक या नात्याने आपल्यावर पालिकेची ‘भ्रष्टाचारी’ ही ओळख पुसण्याची जबाबदारी आहे, असे पत्र भाजप आमदार नितेश राणे यांनी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना लिहिले आहे.
घाटकोपर पश्चिम येथील ‘किरोळ’ गावातील एका इमारत पुनर्विकास प्रकल्पात जलवाहिनीची सुविधा नसतानाही महापालिकेने अंशत: भोगवटा प्रमाणपत्र (पार्ट ओसी) दिले. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायलायाने पालिकेच्या भ्रष्टाचारी कारभाराचे चांगलेच वाभाडे काढले आहेत. महापालिकेचे प्रशासक म्हणून आपले अधिकार हे केवळ बदली करता मर्यादित नसून अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मुभा देतात, असे राणे यांनी पत्रात म्हटले आहे.
( हेही वाचा: काॅंग्रेसला धक्का: गांधी घराण्याचे निकटवर्तीय गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा दिला राजीनामा )
प्रशासक म्हणून आपल्याकडून अपेक्षा
नेहमीप्रमाणे दुर्घटना आणि जीवितहानी झाल्यानंतर मुंबई प्रशासनाला जाग येते, हा समज दूर करणे हे प्रशासक म्हणून आपल्याकडून अपेक्षित आहे, असे राणे यांनी पत्रात नमूद केले आहे.
Join Our WhatsApp Community