राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी दिल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने यासंदर्भात कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बर्वे (वय ३४) असे शरद पवारांना धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. आरोपी सागर बर्वे हा आयटी इंजिनिअर आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले आहे. याप्रकरणी आरोपीला स्थानिक न्यायालयाने १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
(हेही वाचा – न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका, वारकऱ्यांची सुरक्षा महत्वाची – देवेंद्र फडणवीस)
या प्रकरणात लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात मुंबई गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केल्यानंतर पुढील तपास करत विविध पथक तयार करण्यात आली होती. अखेर पवारांना धमकी देणाऱ्याला बेड्या ठोकण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश आले. दरम्यान, आरोपीची कसून चौकशी सुरू असून आरोपीने हे पाऊल का उचलले याचा शोध मात्र सुरू आहे.
दरम्यान, राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक अकाउंटवर ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या नावाने एक अकाउंट आहे. त्यावर असलेल्या पोस्टमध्ये शरद पवार यांना उद्देशून ‘तुझा लवकरच दाभोलकर होणार’, अशी धमकी देण्यात आली होती. तर सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर हँडलवरुन शरद पवार यांची औरंगजेबासोबत तुलना करत आक्षेपार्ह भाषेचा वापर केलेला मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community