Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांचा पक्ष महाविकास आघाडीत तिसऱ्या क्रमांकावर गेल्याने शिवसेना उबाठाकडूनही पवार यांची अवहेलना केली जात असल्याचे दिसून येते. पवार यांनी सोमवारी २४ फेब्रुवारी २०२५ या दिवशी पत्रकार परिषद (press conference) घेतली ती शिवसेना उबाठाच्या दबावाखाली (under pressure Shiv Sena UBT) होती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. तर दबावाखाली बोलत असतानाही शरद पवार (Sharad Pawar) यांनी उबाठाला काही उपहासात्मक कानपिचक्या दिल्याच. (Sharad Pawar)
चिखलफेकीला शरद पवार जबाबदार
शिवसेना नेत्या आणि विधान परिषद उपसभापति नीलम गोऱ्हे (नीलम गोऱ्हे) यांनी शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर एका पदासाठी दोन मर्सिडिस गाड्या द्याव्या लागत होत्या, असा आरोप केल्यानंतर उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी गोऱ्हे यांच्यावर खालच्या शब्दांत टीका केली. तसेच साहित्य संमेलनात राजकारण होत असून या राजकीय चिखलफेकीला शरद पवार हेदेखिल जबाबदार आहेत, असा आरोप केला. त्याचप्रमाणे पवार गप्पा का बसलेत? असा सवाल करत थेट पवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
(हेही वाचा – भारताने क्रिकेट मॅच जिंकताच Hindu तरुणांनी फटाके फोडले; मुस्लिम जमावाने केली हिंदूंना मारहाण)
उद्धव ठाकरे नाराज नाहीत
शरद पवार राजकीय वादावर शक्यतो प्रतिक्रिया देण्याची घाई करत नाहीत, अशी त्यांची प्रतिमा आहे. मात्र, शिवसेना उबाठाच्या दबावाखाली पवार यांनी तब्बेत बरी नसताना पत्रकार परिषद घेतली, अशी चर्चा होत आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आपल्यावर नाराज नाहीत, असे सांगणाऱ्या पवार यांनी संजय राऊत यांना टोमानाही हाणला.
पवार म्हणाले की राऊत (Sanjay Raut) यांचे म्हणणे १०० टक्के बरोबर आहे. नीलम गोऱ्हे यांनी हा वाद निर्माण करण्याची काही गरज नव्हती. नको त्या गोष्टी सांगण्याची गरज नव्हती. अत्यंत कमी कालावधीत गोऱ्हे यांनी चार पक्ष बदलले. त्यांनी स्वतःचा अनुभव लक्षात घेता असं भाष्य करायला नको होतं.
(हेही वाचा – ओएसडी निवडीवर CM Devendra Fadnavis यांचे खडेबोल: म्हणाले, अपारदर्शकता…)
संमेलनाचा वापर राजकारणासाठी नाही
राऊत यांच्या आरोपांवर पवार पुढे म्हणाले की मी साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष होतो त्यामुळे त्यांना (राऊतांना) माझ्यावर जबाबदारी टाकायची असेल तर त्यावर माझा काही आक्षेप नाही, असे सांगतानाच पवार यांनी साहित्य संमेलनाचा वापर राजकारणासाठी होतो हे मात्र खरं नाही, असे स्पष्ट सांगून संजय राऊत (Sanjay Raut) यांना तोंडघशी पाडले.
लक्षात ठेवेन
शरद पवार यांनी दिल्लीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा पुरस्कार देऊन सत्कार केला, त्यावरही राऊत यांनी पवार यांचा समाचार घेतला होता. पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याला जायला नको होते, असा सल्ला राऊत यांनी त्यांना दिला होता. सोमवारी पवार यांनी संधीचा फायदा घेत राऊत यांच्यावर उपरोधिक टीका (sarcastic remarks) केली. पवार म्हणाले एका संस्थेने शिंदेंचा सत्कार ठेवला तिथे मी होतो आणि त्यात सहभागी झालो. शिंदें यांच्यासह १५ लोकांना पुरस्कार दिला गेला. त्यातील १४ लोकांची नावे कोणी छापली नाहीत. हा पुरस्कार कोणत्या राजकीय संघटनेने नाही तर दिल्लीतील मराठी लोकांनी दिला, असे सांगून, “मी कुणाचा सत्कार करायचा आणि करायचा नाही, याची परवानगी घ्यावी लागत असेल तर मी लक्षात ठेवेन,” असा टोला पवार यांनी राऊत यांना लगावला.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community