- खास प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) गेले दोन दिवस आजारी पडल्याने ‘मविआ’त त्राहीमामसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
‘सिल्व्हर ओक’वर विश्रांती
एकीकडे मविआचे आधारस्थंभ राष्ट्रवादी काँग्रेस (शप) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) आजारी असून पुढील काही दिवस त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याचे सांगण्यात आले. खोकला आणि बोलण्याचा त्रास होत असल्याने पवार यांनी मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी विश्रांती घेणे पसंत केले आहे. पुढील काही दिवस पवार यांचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले असून यामुळे आघाडीत मात्र त्राहीमाम माजले आहे.
(हेही वाचा – Bangladesh मध्ये इस्लामिक कट्टरपंथींनी पुजारीसह ३ हिंदूंचे केले अपहरण; बशीर, आरिफसोबत ४ जणांना अटक)
ठाकरे संभ्रमात
उद्धव ठाकरे एक दिवस महापालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याचे संकेत देत आहेत तर दुसरीकडे आघाडी करण्यास इच्छुक असल्याचे दिसून येते. ठाकरे हे महापालिका निवडणुकीत कोणती भूमिका घ्यायची याबाबत संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी २७ जानेवारी २०२५ या दिवशी तर शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांच्याकडून ‘मुंबईत स्वतंत्र आणि अन्य महापालिका निवडणुकीत आघाडी’ अशी विचित्र भूमिका घेण्याचा विचार होऊ शकतो,’ असे सूचित केले.
काँग्रेस ‘कोमा’त
काँग्रेसचे तर आणखी वेगळेच सुरू असून मविआमधील तीन पक्षांची तोंडे तीन वेगळ्या दिशेने जात असल्याचे दिसत आहे. काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू असून पक्षाला नवा प्रदेशाध्यक्षही मिळेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरुण आमदार किंवा नेते प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारण्यास उदासीन असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मुंबई महापालिका निवडणुकीबाबत सगळे पक्ष बैठका घेत असले तरी काँग्रेस अद्याप विधानसभा निवडणूक हरल्याने ‘कोमा’त आहे की काय? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
अशा परिस्थितीत आघाडीला बळ देण्यास शरद पवारही (Sharad Pawar) उपलब्ध नसल्याने ‘मविआ’वर मोठे संकट कोसळण्यासारखे वातावरण पसरले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community