Sharad Pawar आणि Uddhav Thackeray यांनी काँग्रेसला एकटे पाडले?

44
Sharad Pawar आणि Uddhav Thackeray यांनी काँग्रेसला एकटे पाडले?
  • खास प्रतिनिधी

शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि शिवसेना उबाठा यांनी काँग्रेसला महाविकास आघाडीत एकटं पाडल्याचे चित्र दिसत आहे.

लोकसभेला महाविकास आघाडीला अनपेक्षित यश मिळाले. ४८ लोकसभा जागांपैकी ३२ वर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. त्यात काँग्रेसचे सर्वाधिक १३ आणि एक काँग्रेस बंडखोर असे १४ तर शिवसेना उबाठा ९ आणि राष्ट्रवादी (शप) ९ उमेदवार लोकसभेत गेले.

मुख्यमंत्री पदासाठी एकमेकांवर कुरघोडी

लोकसभेला मिळालेल्या यशानंतर ‘मविआ’चा आत्मविश्वास प्रचंड वाढला आणि विधानसभा निवडणुकीनंतर मविआचेच सरकार राज्यात येणार असे गृहीत धरून मुख्यमंत्री पदासाठी एकमेकांवर कुरघोडी सुरू झाली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्यासाठी काँग्रेसवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये अंतर्गत चढाओढीत खतपाणी मिळाले.

(हेही वाचा – Metro Line-4 : स्थापत्य कामात तब्बल 1274.80 कोटींची वाढ; 5 वर्षांची प्रकल्प दिरंगाई उघड)

‘ससा आणि कासव’ गोष्ट

जागावाटपात एका-एका जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना उबाठामध्ये रस्सीखेच सुरू झाली. विदर्भातील जागांवरून तर रणकंदन झाले. यात ‘ससा आणि कासवा’च्या गोष्टीतील कासवाप्रमाणे महायुतीने कामाचा जोर वाढवला आणि सत्तेची शर्यत जिंकली. राज्यात ‘मविआ’चे सत्तेचे स्वप्न भंग पावले. पुढील काही दिवस ‘मविआ’ नेत्यांचा निकालावर विश्वासच बसत नव्हता. यातूनच काँग्रेस आणि शिवसेना उबाठा नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या.

काँग्रेसच्या गैरहजेरीत ठाकरे-पवार बैठक

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या गैरहजेरीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी त्यांना भेटायला गेले आणि सुमारे दीड तास विविध विषयांवर चर्चा केली. यात विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पद शिवसेना उबाठाला मिळावे, यासाठी काँग्रेसवर दबाव टाकावा, असाही प्रयत्न झाल्याचे समजते. त्याप्रमाणे मंगळवारी २१ जानेवारी २०२५ या दिवशी महाविकास आघाडीच्या बैठकीत विरोधी पक्ष नेते पदाबाबत चर्चा झाली. बैठकीनंतर नाना पटोले यांनी सांगितले की दोन तीन दिवसांत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करून विरोधी पक्ष नेते पदाचा निर्णय घेतला जाईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.