स्वबळावर निवडणूक लढवणार. पण स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते. निवडणुकीत लढून जिंकण्यासाठी या भुज्यांमध्ये ताकद लागते. आणि घरात बसून लढता येत नाही. तु लढो हम कपडा समालते हैं, असं बोलून निवडणूक जिंकता येत नाही. तसंच कार्यकर्त्यांची मनंही जिंकता येत नाहीत. त्यासाठी कार्यकर्त्यांबरोबर रस्त्यावर उतरून काम करावं लागतं. त्यांच्या सुख दु:खात समरस व्हावं लागतं, या शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
बाळासाहेबांची नाक घासून माफी मागावी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 99वी जयंतीनिमित्ताने मुंबईतील बीकेसीत शिवसेनेने शिवोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्यांना फक्त शिवसेना प्रमुखांची जंयती एवढेच आठवते. मात्र स्मारकात गेल्यावर ज्या लोकांनी बाळासाहेबांची विचार सोडले त्यांना बोलवणार नाही, असे ते म्हणाले. खरं म्हणजे जे बाळासाहेबांच्या विचारांचे मारक आहेत, ते काय बांधणार स्मारक? अशी परिस्थिती आहे. म्हणून तुम्हाला हे बोलण्याच नैतिक अधिकार नाही. कारण बाळासाहेबांचे विचार 2019 लाच सोडण्याच पाप तुम्ही केले. म्हणून मी सांगतो त्यादिवशी खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या स्मारकावर जाण्यापूर्वी त्यांनी बाळासाहेबांची नाक घासून माफी मागावी, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) म्हणाले.
(हेही वाचा वेळ आली तर स्वबळावर लढेन; मेळाव्यातून Uddhav Thackeray यांचा मित्रपक्षांना इशारा)
लोकसभेपाठोपाठ आपण विधानसभेतही मोठे मताधिक्य मिळवले. बाळासाहेबांचे विचार आपण कधीही सोडला नाही. त्यामुळे आपल्याला दणदणीत विजय मिळाला. म्हणूनच आजचा हा दिवस आपण साजरा करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हा विजय कुणीही विसरू शकत नाही. हा विजय लाडक्या बहिणींचे, भावांचे, तरुणांचे, शेतकऱ्यांचा आहे. या महाराष्ट्रातील जनतेने 60 आमदार आपल्याला दिले याचा मला आनंद आहे. त्यामुळे सर्व शिलेदारांचे अभिनंदन करतो. हा एकनाथ शिंदे शिवसेना वाढवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचा शब्द देतो, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) म्हणाले.
काम करो ऐसा की एक पहचान बन जाए हर कदम ऐसा चलो की निशाण बन जाए यहा जिंदगी तो हर कोई काट लेता है, जिंदगी जिओ इस कदर की मिसाल बन जाए, असे सांगत महाराष्ट्राच्या घराघरात आणि लोकांच्या मनामनात शिवसेना पोहोचवायची आहे. गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक हे आपले मिशन आहे. प्रत्येकाच्या मनामनात शिवसेना पोहोचवण्याचा प्रयत्न करा. जेवढे कामे आपण केली आहेत. ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम आपल्याला करण्याचे आहे. आज देशातील अनेक राज्यातील लोक शिवसेनेची मागणी करत आहेत. त्यामुळे बलशाली शिवसेना उभी करण्याचे काम आपल्याला करायचे आहे. बलशाली आणि मजबूत शिवसेना हीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) म्हणाले.
Join Our WhatsApp Community