उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना कॉल; इगो संपल्यामुळे की इगो वाढल्यामुळे?

89

माध्यमांत अशी चर्चा होती की उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना कॉल केला आणि एकनाथ शिंदेंना पाठिंबा देऊ नये, त्यांना मुख्यमंत्री करु नये अशी विनवणी केली. त्याऐवजी मी सगळी शिवसेना घेऊन तुमच्यासोबत येतो असंही त्यांनी म्हटलं. ही बातमी सर्वात आधी साम वाहिनीने दाखवली. अर्थात त्यांच्या सूत्रांनी ही बातमी त्यांना दिली.

वार्तांकनाच्या दुनियेत सूत्र नावाचा प्राणी नेमका कसा दिसतो, कुठे असतो हे अजून तरी कळलेलं नाही. बर्‍याचदा एखादी बातमी मुद्दामून पेरायची असेल, नॅरेटिव्ह सेट करायचा असतो तेव्हा सूत्र या घटकाचा वापर केला जातो. आता ही बातमी खरी आहे की खोटी हे कुणीच सांगू शकत नाही. ही बातमी खरी आहे असं समजून आपण याचं विश्लेषण करुया. कारण काही दिवसांपूर्वी ठाकरेंनी फडणवीसांना फोन केला होता पण त्यांनी फोन उचलला नाही अशीही बातमी देण्यात आली होती.

आता ही बातमी खरी आहे असं मानून आपण यावर विचार करणार आहोत. उद्धव ठाकरेंनी इतका उशीरा फोन का केला असेल? शिवसेनेच्या आमदारांनी उठाव केला असला तरी ठाकरेंची भाषा आपण मालक आहोत आणि सगळे आमदर आपले गुलाम आहेत अशीच होती. भाजपावर देखील टीका करण्यात आली होती. मग इतक्या दिवसांनी आपण पुन्हा भाजपासोबत जावे असं ठाकरेंना का वाटलं असावं? त्यांचा इगो आता संपला आहे का?

तर असं मुळीच नाही. उद्धव ठाकरेंच्या समजूतीनुसार एकनाथ शिंदे हे साधे रिक्षावाले आहेत. ठाकरे कुटुंबाने त्यांना मोठं केलेलं आहे. आपण मालक आहोत ही भावना ठाकरेंच्या मनात घर करुन राहिलेली आहे. मुळात स्वतः ठाकरे पिता-पुत्र हे बाळासाहेब ठाकरेंच्या कृपेने या उच्च पदावर बसलेले आहेत. शिवसैंनिकांच्या मनात बाळासाहेबांविषयी प्रचंड आदर आहे. आपण बाळासाहेबांमुळे घडलो असं सांगायला कोणत्याही शिवसैनिकाला कमीपणा वाटत नाही. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत म्हणून त्यांना अतिरिक्त सन्मान द्यायला शिवसैनिक तयार झाले. पण ठाकरे हे मालक असल्याच्या मनःस्थितीतून बाहेर पडत नाहीत ही खूप मोठी समस्या आहे.

आपण ज्याला मोठं केलं तो आपल्या विरोधात उठतो आणि आपल्याला बाजूला पाडून मुख्यमंत्री होतो हे ठाकरेंच्या इगो असलेल्या मनाला न पचणारे आहे. एकवेळ फडणविस मुख्यमंत्री झाले असते तर ठाकरेंना कमी दुःख झालं असतं. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले याचं दुःख खूप मोठं आहे. उद्धव ठाकरे हे भांडवशाहीचे प्रतीक आहेत. भांडवलशाहीला आपल्यापेक्षा लहान असलेल्या माणसाने मोठं झालेलं पचत नाही. म्हणून ठाकरेंनी केलेला रहस्यमय कॉल हा प्रचंड इगोमुळे केलेला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.