नेहरूंनी ९ वेळा आणि इंदिरा गांधी (Indira Gandhi) पंतप्रधान असताना ४ वेळा लाल किल्ल्यावरून देशातील गरिबी हटविण्याबाबत भाष्य केले. परंतु, दीर्घकाळ सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसला गरिबी हटवता आली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी २०१४ नंतर खऱ्या अर्थाने देशातील गरिबी हटवण्याचे कार्य केले, असे उद्गार भाजपाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी गुरुवार, २२ फेब्रुवारी रोजी काढले.
सायन कोळीवाडा मतदारसंघातील महिला लाभार्थ्यांशी गुरुवारी नड्डा यांनी संवाद साधला. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सह संघटन मंत्री शिवप्रकाश, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, तामिळ सेलवन, महामंत्री संजय उपाध्याय आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
(हेही वाचा – Mumbai-Pune Expressway ब्लॉक मुंबईकडे जाणारी वाहतूक ‘या’ वेळेत राहणार बंद)
नड्डा म्हणाले, देशात स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ काँग्रेसने (Congress) राज्य केले. गरिबी हटवण्याचा नारा दिला. पण त्यांना त्यात यश मिळाले नाही. इंदिरा गांधी यांच्या काळात देशात गरिबी ६० टक्के आणि महागाई ३० टक्के होती. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, त्यांची नेतेमंडळी गरिबी हटवण्याचे आश्वासन देऊन मत मागायचे, पण त्यासाठी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करायचे नाहीत. त्यामुळेच भारतातील गरीब गरीबच राहिला. २०१४ नंतर मात्र हे चित्र बदलण्यास सुरुवात झाली.
देशातील गोर-गरिबांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ताकद दिली. गरिबी हटविण्याची गॅरंटी मोदींनी घेतली. ५५ कोटी गरिबांची बँकेत मोफत खाती उघडली. कोरोना काळात गरिबांच्या खात्यात पैसे दिले. मुद्रा योजनेंतर्गत कोणत्याही हमीशिवाय कर्ज उपलब्ध करून दिले. फेरीवाल्यांसाठी पीएम स्वनिधी योजना लागू केली. गाव, गरीब, वंचित, शोषित, पीडित, शेतकरी, कष्टकऱ्यांना ताकद देण्याचे काम मोदींनी केले, असेही नड्डा यांनी सांगितले.
काँग्रेसने भ्रष्टाचार आणि लोकांची फसवणूक करण्याशिवाय काहीच केले नाही
मी जेव्हा आमदार झालो, तेव्हा तत्कालीन सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू होती. इंदिरा आवास योजना. या योजनेंतर्गत प्रत्येक विभागासाठी फक्त २ घरे मिळायची. नरेंद्र मोदी आल्यानंतर यात बदल झाला. मोदींनी १० वर्षांत साडेचार कोटी नागरिकांना पक्के घर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या विविध योजनांचे एकट्या सायन कोळीवाड्यात ३० हजार लाभार्थी असल्याची माहिती जे.पी. नड्डा यांनी यावेळी दिली. लाभार्थ्यांची चर्चा सगळ्यांनी केली, पण मोदींनी गरिबांसाठी जे काम केले, तर आजवर कोणालाही जमले नाही. काँग्रेसने भ्रष्ट्राचार, भाषणे देणे, लोकांची फसवणूक करण्याशिवाय काहीच केले नाही. राहुल, सोनिया, लालू सध्या ‘बेल’वर आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
मोदींच्या नेतृत्त्वाखाली विकसित भारत निर्मितीचे काम सुरू
नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान झाल्यापासून साडेबारा कोटी लाभार्थ्यांना शौचालये मिळाली. उज्ज्वला योजनेंतर्गत १० कोटी घरांत गॅस पोहोचला. त्यातील ४८ लाख लाभार्थी महाराष्ट्रातील आहेत. जागातील सगळ्यात मोठी आरोग्य योजना मोदींनी काढली. आयुष्यमान भारत योजना. महाराष्ट्रात या योजनेचे ८३ लाख लाभार्थी आहेत. ३ कोटींहून अधिक महिलांना लखपती दीदी बनवण्याचे आमचे ध्येय आहे. विकसित भारत यात्रा काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे, लाभापासून वंचित राहिलेल्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे. मोदी गॅरंटीमुळे देशातील २५ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली विकसित भारत निर्मितीचे काम सुरू, असेही जे.पी. नड्डा म्हणाले. (J. P. Nadda)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community