काश्मीरमधील ३७० कलम हटविणे हा मोदी सरकारसाठी भावनात्मक विषय असून त्याच आधारावर भाजपच्या देशभरात ३७० जागा निवडून आणायच्या आहेत. देशात एनडीए ४०० पार करण्यासाठी मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर आणण्यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील विकसित भारताचा १० वर्षांचा काळ आपण पाहिला, हे आपले सौभाग्य आहे. ही लोकसभेची लढाई केवळ जिंकण्यासाठी नाही, तर मोठ्या फरकाने आपल्या जागा निवडून आणण्यासाठी आहे, असे आवाहन (J P Nadda) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केले. मुंबईत बुधवारी (२१ फेब्रुवारी) आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
(हेही वाचा – Google Releases Open AI : गुगलचं नवीन एआय मॉडेल मोफत उपलब्ध होणार)
जेपी नड्डा यांचा मुंबई दौरा –
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नड्डा दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत. दरम्यान अंधेरी येथील कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, संचालन समितीचे समन्वयक अतुल भातखळकर यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (J P Nadda)
मुंबईने मोदींवर भरभरून प्रेम केले – जेपी नड्डा
मुंबईने मोदींवर भरभरून प्रेम केले आहे व मतेही दिली आहेत. मोदी सरकारच्या पाठिंब्यामुळेच अटल सेतू, मेट्रोसह मुंबईकरांसाठी अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत. मोदी यांचा विकासाचा मार्ग असून काँग्रेस व राहुल गांधी देश तोडण्याचे काम करीत आहे. विरोधकांची आघाडी ही भ्रष्टाचारी व घराणेशाही जपणाऱ्यांची आहे, अशी टीका नड्डा यांनी केली. (J P Nadda)
(हेही वाचा – Congress : काँग्रेसचा हिंदुद्वेष; कर्नाटकातील काँग्रेस सरकार हिंदू मंदिरांवर लावणार ‘झिजिया कर’)
मतदारांना भेटून मोदींचे विकासाचे राजकारण पोहोचवा
नड्डा (J P Nadda) पुढे म्हणाले, पुढील १०० दिवस आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांच्या काळात देशाला प्रगतीच्या दिशेने नेले आहे. त्याच आधारावर तिसऱ्यांदा देशातील जनता मोदी यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी सज्ज झाली आहे. या निमित्ताने मतदारांना भेटा, त्यांच्यापर्यंत मोदींचे विकासाचे राजकारण पोहोचवा. (J P Nadda)
(हेही वाचा – Smita Thackeray : बाळासाहेब मला राज्यसभेवर पाठवणार होते; पण…; स्मिता ठाकरेंनी मुलाखतीमध्ये संवेदनशील विषयांवर केले भाष्य)
सत्तेत आहात तर नम्र रहा –
महागड्या गाड्यांमधून फिरणे बंद करा. सत्तेत आहात तर नम्र रहा; दिखाऊपणा करू नका, असे खडे बोलही त्यांनी (J P Nadda) यावेळी सुनावले. सत्ता आली की अनेकांचे तंत्र बिघडते. भाजपचे नेते, कार्यकर्ते त्याला अपवाद असले पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत केलेल्या अनेक कामांची शिदोरी आपल्याजवळ आहे. सामान्य माणसांना या कामगिरीविषयी साध्या सोप्या भाषेत सांगितले पाहिजे. त्यांच्या वस्त्यांमध्ये तुम्ही जाल तेव्हा सत्तेत असलेली बडेजाव दाखवणारी माणसे आली आहेत असे मुळीच वाटता कामा नये. (J P Nadda)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community