भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP president J P Nadda’s) यांच्या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ २०२४ पर्यंत वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. शहा यांनी सांगितले की, ‘नड्डा यांचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवण्यात आला आहे.’
२०२४ नंतर अध्यक्षपदासाठी एका वजनदार मराठी नेत्याच्या नावाची चर्चा
नड्डा यांच्यानंतर म्हणजे २०२४ नंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी एका वजनदार मराठी नेत्याच्या नावाची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. भाजपच्या कार्यकारिणीत हा प्रस्ताव मंजूर झाल्याचेही शहांनी सांगितले. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हा प्रस्ताव मांडला आणि सर्वांनी एकमताने मंजुरी दिली. भाजपच्या इतिहासात पक्षाचे पहिले अध्यक्ष दिवंगत अटलबिहारी वाजपेयी सोडले तर राष्ट्रीय अध्यक्षांना सलगपणे मुदतवाढ मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी नितीन गडकरी अध्यक्ष असताना, संघनेतृत्वाच्या इच्छेनुसार पक्षाध्यक्षांचा कार्यकाळ वाढवण्याबाबत भाजपने घटनादुरुस्ती केली होती. त्याचा फायदा आता नड्डा यांना अनपेक्षितरित्या झाला आहे.
लोकसभा निवडणुका २०२४ मध्ये होणार आहेत. या निर्णयानंतर लोकसभा निवडणुकीच्या वेळी नड्डा हेच भाजपचे अध्यक्ष राहतील हे स्पष्ट झाले आहे. सदस्यत्व मोहीम पूर्ण न झाल्यामुळे त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आल्याचे शहा यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘कार्यकाळ वाढवण्याचा प्रस्ताव माजी अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी ठेवला होता, जेपी नड्डा २० जानेवारी २०२० रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यांच्या कार्यकाळात भाजपने, सेवा ही संघटन, मेरा बूथ सबसे मजबूत यासारख्या मोहिमा यशस्वीपणे राबवल्या. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गोव्यासह अनेक राज्यांमध्ये भाजपने सत्ता मिळवली अध्यक्षपदी नड्डा हेच होते. या वर्षातल्या ९ आणि पुढील वर्षातल्या लोकसभा निवडणुकीत नड्डा यांच्यासारखे नेमस्त नेतृत्व आणि चेहरा कायम ठेवण्याच्या दृष्टीने भाजप नेतृत्वाने अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे कायम ठेवली आहे.
(हेही वाचा – महाराष्ट्रात काँग्रेसची स्थिती सुधारण्यासाठी नाना पटोलेंना हटवा, काँग्रेसच्या नेत्याची मागणी)
Join Our WhatsApp Community