कोणालाही भारताबाहेर जाऊन भारताबद्दल वाईट बोलण्याचा, भारताच्या शत्रूंसोबत बसण्याचा अधिकार नाही. आपण जेव्हा देशाबाहेर जातो तेव्हा देशाचे राजदूत असतो, त्यामुळे राष्ट्रवाद सोडून इतर कशाचाही विचार करणे योग्य नाही, असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) म्हणाले.
दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव येथील डोकमर्डी सभागृहात आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात शनिवारी ते उपस्थितांना संबोधित करत होते. दादरा आणि नगर हवेली; दमण आणि दीव तसेच लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल पटेल, दादरा आणि नगर हवेली’च्या खासदार डेलकर कलाबेन मोहनभाई आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
परदेशात भारताचे प्रतिनिधित्व करताना राष्ट्राचा सन्मान आणि अभिमान राखण्याचे महत्त्व उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले. दिवसातले 24 तास राजकारणाला बळी पडू नका. राजकारण देशापेक्षा वरचढ असू शकत नाही. विकासाच्या बाबतीत राजकारण होता कामा नये. राष्ट्रवाद, राष्ट्राची प्रगती आणि विकासाचे मोल देऊन आपण अतिरेकी राजकारणाला बळी पडू शकत नाही, असेही ते म्हणाले.
(हेही वाचा – PM Narendra Modi करणार पुण्यातील अंडरग्राउंड मेट्रोचे उद्घाटन)
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या अनुकरणीय आचरणाचा दाखला देत, उपराष्ट्रपतींनी अशा काळाकडे निर्देश केला जेव्हा काँग्रेस सरकार सत्तेत असताना विरोधी पक्षाचे नेते असले तरी वाजपेयी भारताच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व परदेशात करत होते. अटलजींच्या सर्व कृती एकाच ध्येयाने भारलेल्या होत्या – ‘माझा भारत महान, माझा भारत, माझा राष्ट्रवाद’, असे उपराष्ट्रपतींनी सांगितले.
मंत्री म्हणून काम करत असताना 1990 मधील आपल्या जम्मू आणि काश्मीर भेटीच्या आठवणीला उजाळा देत उपराष्ट्रपतींनी तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीमधील फरक लक्षात आणून दिला. त्यावेळी, माझ्या भेटीदरम्यान मला 30 लोक सुद्धा दिसले नव्हते आणि या वर्षी सुमारे 2 कोटी पर्यटकांनी जम्मू आणि काश्मीरला भेट दिली आणि एक महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून या प्रदेशाचे महत्त्वपूर्ण पुनरुत्थान अधोरेखित केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community