जगदीप धनखड यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ

131

पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांनी देशाचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून आज, गुरुवारी शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धनखड यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह विविध पक्षातील नेते उपस्थित होते.

(हेही वाचा – मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ निर्णय योग्य आणि न्याय देणारा, शहाजीबापू पाटलांचं विधान!)

शपथविधी सोहळ्यापूर्वी धनखड यांनी दिल्लीतील राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी आदरांजली वाहिली. यासंदर्भात ट्विटरवर संदेश जारी करत धनखड म्हणाले की, राजघाटावरील निर्मळ आणि शांत वातावरणात पूज्य बापुंचा आशिर्वाद घेतल्यानंतर धन्य वाटल्याचे सांगत त्यांनी व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

https://twitter.com/jdhankhar1/status/1557564958287994880?s=20&t=R-MA84s9HZ7poZ3fkaGNOg

धनखड यांची राजकीय कारकीर्द

  • देशाचे चौदावे उपराष्ट्रपती बनलेल्या धनखड यांनी जनता दलातून राजकारणाला सुरुवात केली.
  • धनखड 1989 मध्ये झुंझुनूमधून खासदार झाले. पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्यावरच त्यांना मोठा पुरस्कार मिळाला.
  • 1989 ते 1991 या काळात व्हीपी सिंह आणि चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये त्यांना केंद्रीय मंत्रीही करण्यात आले होते. मात्र, 1991 च्या लोकसभा निवडणुकीत जनता दलाने जगदीप धनखड यांचे तिकीट कापले तेव्हा त्यांनी पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
  • 1993 मध्ये अजमेरमधील किशनगडमधून काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि आमदार झाले. 2003 मध्ये त्यांचा काँग्रेसशी भ्रमनिरास झाला आणि त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.
  • 2019 मध्ये जगदीप धनखड यांना पश्चिम बंगालचे राज्यपाल बनवण्यात आले.उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जगदीप धनखड यांना 528 मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांना 182 मते मिळाली.
  • धनखड यांनी एकूण वैध मतांपैकी 72 टक्क्यांहून अधिक मतांसह उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली होती.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.