पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू काश्मीर दौऱ्याबाबत एनआयएने धक्कादायक खुलासा केल्याचे समोर आले आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या या दौऱ्याला दौऱ्याला जैश-ए-मोहम्मदने टार्गेट केल्याचा खळबळजनक गौप्यस्फोटदेखील एनआयएने केला आहे. जैशचा म्होरक्या मसूद अजहरनेच हा कट रचल्याचे एनआयएने म्हटले आहे. त्यामुळे जैशच्या निशाण्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव पुन्हा अधोरेखित झाल्याच्या चर्चा रंगताना दिसताय.
(हेही वाचा – …म्हणून शिवराज पाटील यांनी माफी मागितली पाहिजे, बावनकुळेंची मागणी)
यंदा एप्रिलमध्ये मोदी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी एका झालेल्या चौकशीबाबत चौकशी करण्यात आली होती. या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. कारण २४ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर होते. असेही सांगितले जाते की, मोदींच्या दौऱ्याच्या ४८ तास आधी म्हणजेच २१ आणि २२ एप्रिलच्या दरम्यान अतिरेकी आणि सैन्य दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये चार अतिरेक्यांना कंठस्थान घालण्यात आले होते. त्यात एक जवान शहीर झाले तर ४ जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली होती.
दरम्यान, मोदींच्या रॅलीपूर्वी जैशच्या ६ अतिरेक्यांनी जम्मूमध्ये सीआयएसएफच्या बसवर हल्ला देखील चढवला होता. यावेळी झालेल्या चकमकीत दोघांचा खात्मा करण्यात आला होता. तर मोदींच्या होणाऱ्या रॅलीवरही अतिरेक्यांचा निशाणा होता, असे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community