गुलाबराव पाटील गुवाहाटीला कसे पोहचले? मुख्यमंत्र्यांनी सांगितला ‘तो’ किस्सा

153

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी जळगाव जिल्ह्याच्या दौ-यावर होते. या दौ-यादरम्यान त्यांनी बडगुजर समाजाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी सहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झाले तेव्हा शिंदे गटाचे आमदार आपल्यासोबत कसे आले याबाबत थोडक्यात भाष्य केले. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना आपल्यासोबत जायला खूप अडचणी आल्या. ते अक्षरश: अॅम्बुलन्समध्ये बसून आले. तसेच, गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांना माहिती आहे ते कसे आले, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही धाडसाने निर्णय घेतले. पेट्रोल- डिझेलचे भाव कमी करण्याचे निर्णय कोणी घेत नव्हते. आम्ही केले. आम्ही नेहमी जमिनीवर राहून काम करणारे कार्यकर्ते आहोत. सत्तेची हवा कधीच आमच्या डोक्यात जाणार नाही. सरकार तुमच्या पाठीशी आहे एवढा विश्वास बाळगा, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

( हेही वाचा: दादरमधील मुस्लिम फेरीवाल्यांविरोधातील आंदोलनात भाजपमध्येच फूट )

केंद्र सरकारचा राज्याला पाठिंबा

मुख्यमंत्री म्हणाले की, सीएम म्हणजे लोक म्हणतात चीफ मिनिस्टर. पण मी म्हणतो काॅमन मॅन, सर्वसामान्य माणूस, आपल्या राज्याला केंद्राचादेखील मोठा पाठिंबा आहे. केंद्र सरकारने आपल्याला दोन हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. केंद्राचादेखील आमच्या सरकारला पाठिंबा आहे. म्हणून त्यांच्याशी संबंध जोपासावे लागतात, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.