राज्यात सर्वत्र चर्चेत असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंची अनेक वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आले. या निवडणुकीत मुक्ताईनगर येथील मतदारसंघातून भाजपचे उमदेवार मंगेश चव्हाण हे 76 मतांनी विजयी झाले आहे. तर एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.
एकनाथ खडसेंच्या गडाला सुरुंग
खडसेंचे वर्चस्व असलेल्या जळगाव दूध संघावर भाजप-शिंदे गटावे विजय मिळवला. एकूण 20 पैकी 16 जागांवर भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहे. खडसे यांच्या गटाला केवळ चार जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपचे नेते गिरीश महाजन ताकदीनिशी उतरले होते. त्याचवेळी शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनीही पहिल्यांदा दूध संघाच्या निवडणुकीत सहभाग घेतला होता. जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलच्या पराभव झाला. यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, विरोधी पक्षाकडून खोक्यांसह साम-दाम-दंड भेद नीतीचा वापर केला गेला, त्यामुळेच आम्हाला या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. मात्र पराभव शेवटी पराभव असतो, तो आम्हाला मान्य आहे. नव्यावे निवडून आलेल्या संचालकांनी चांगल काम करून दाखवावे ही अपेक्षा आहे, असेही खडसे म्हणाले.
(हेही वाचा Samruddhi Mahamarg : अजित पवारांनी विचारला ‘हा’ खोचक प्रश्न)
Join Our WhatsApp Community