जळगाव जिल्हा दूध संघातील सुमारे सव्वा कोटी रुपये किमतीचे लोणी आणि दूध पावडरच्या अपहारप्रकरणी अखेर जळगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
( हेही वाचा: मुंबई पोलीस दलात आणखी किती सचिन वाझे? )
नेमके प्रकरण काय?
एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या जळगाव जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा आहेत. त्यामुळे या प्रकरणात त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी दूध संघात सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचे 14 टन लोणी आणि 9 टन दूध पावडरचा अपहार झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. हा अपहार दूध संघाच्या अध्यक्षा, कार्यकारी संचालक तसेच काही कर्मचा-यांनी केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते. त्याचप्रमाणे दूध संघात सुमारे सव्वा कोटी रुपयांचे 14 टन लोणी व 9 टन दूध पावडरचा अपहार झाल्याचा जबाब पोलिसांना दिला होता. परंतु नंतर पोलिसांत जाऊन हा अपहार नसून चोरी असल्याची तक्रार केली होती. हाच मुद्दा लक्षात घेऊन पोलिसांनी दूध संघाची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दूध संघातील जबाबदार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community