मागच्या काही महिन्यांपासून कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्याला लोडशेंडिंगचा सामना करावा लागत आहे. आता याचा फटका थेट राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना बसला आहे. नितीन राऊत सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. तेथे ते ज्या विश्राम गृहावर मुक्कामाला थांबले त्याच विश्राम गृहाचा काही काळासाठी वीजपुरवठा खंडित झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, राज्यात मागच्या 22 दिवसांपासून लोड शेडिंग न झाल्याची बातमी गुरुवारीच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली होती.
अधिका-यांची उडाली तारंबळ
जळगाव दौ-यावर असताना नितीन राऊत गुरुवारी भुसावळ येथील औष्णिक केंद्राच्या विश्राम गृहात थांबले होते. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन राऊत हे गुरुवारी रात्री उशिरा प्रवास करुन आल्यानंतर, त्यांनी विश्राम गृहात प्रवेश केला. परंतु, विश्राम गृहात प्रवेश केल्यानंतर, काही वेळातच तेथील वीज पुरवठा खंडित झाला. उर्जा मंत्र्यांच्याच समोर वीज गेल्याने औष्णिक केंद्रातील कर्मचारी आणि अधिका-यांची चांगलीच तारंबळ उडाली. ऊर्जा मंत्री राहणा-या विश्राम गृहाचीच वीज खंडित झाल्याने, सध्या हा चर्चेचा विषय बनला आहे. काही वेळाने वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.
( हेही वाचा: आरोग्य विभागात 10 हजार पदांची भरती )
अन् मंत्र्यांनाच लोड शेडिंगचा बसला फटका
राज्यात मागच्या 22 दिवसांपासून लोड शेडिंग न झाल्याची बातमी गुरुवारीच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली होती. पण त्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांना फटका बसल्याचे, समोर आले आहे.
Join Our WhatsApp Community