भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांकडून अमानुष मारहाण! निलंबनाची मागणी! 

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या भारतीय युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना जर क्षुल्लक कारणावरून अमानुष मारहाण होत असेल, तर याची सरकारने गंभीरपणे दखल घेऊन संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केले पाहिजे, असे आमदार बबनराव लोणीकर म्हणाले. 

दर्शन देवावले या तरुणाचा अपघात झाल्याने त्याला जळगावातील दीपक रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले हे त्या ठिकाणी आले असता पोलिस त्याठिकाणी मयत तरुणाच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत होते, याचे शिवराज चित्रीकरण करत होते, म्हणून पोलिसांनी नारियलवाले यांना लाठ्याकाठ्याने अमानुष मारहाण केली, अक्षरशः काठ्या तुटेपर्यंत मारले. याचा सोशल मीडियातून तीव्र शब्दांत निषेध होत आहे. ही मारहाण करणाऱ्या पोलिसांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर, आमदार राम सातपुते, भाजपचे आमदार बबनराव लोणीकर, चित्रा वाघ यांनी केली आहे.

पोलिसांचे तात्काळ निलंबन करावे!

हा व्हिडीओ 9 एप्रिलचा आहे. दर्शन देवावले या तरुणाचा अपघात झाला होता. त्याला जालना शहरातील दीपक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते. उपचारा दरम्यान दर्शन देवावले याचा मृत्यू झाला. त्यानंतर हा प्रकार घडला आहे. जालना पोलिस उपविभागीय अधिकारी सुधीर खिराडकर आणि पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या पोलिस पथकाने शिवराज नारियलवाले यांना अमानुष मारहाण केली. भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीत शिवराज नारियलवाले यांना अमानुष हल्ला करणाऱ्या मुजोर पोलिसांचे निलंबन होत नाही तोपर्यंत शांत राहणार नाही, संबंधित पोलिसांचे तात्काळ निलंबन करा, अशी मागणी माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांनी ट्विटरवरुन केली आहे.

कोरोनाकाळात जनसेवा केली!

महाविकास आघाडी सरकार आल्यापासून राज्यात संत, महंत, महिला आणि तरुण यांना मारहाण होत आहे. हे सरकार रझाकारी प्रवृत्तीचे आहे का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. शिवराज हे अन्यायाला वाचा फोडणार म्हणून मनात राग धरून पोलिसांनी त्यांना अमानुषपणे मारले आहे. कोरोनाकाळात भारतीय युवा मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांनी खूप जनसेवा केली. काही दिवसांपूर्वीच शिवराज यांनी रक्तदान शिबीर भरवून १०० तरुणांचे रक्त संकलन केले होते. अशा प्रक्रारे त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली होती. अशा पदाधिकाऱ्यांवर जर क्षुल्लक कारणावरून मारहाण होत असेल, तर याची सरकारने गंभीरपणे दखल घेऊन संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केले पाहिजे, असे आमदार लोणीकर म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here