Jalna Maratha Andolan : लाठीमार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा; मुख्यमंत्री शिंदेनी दिले पोलिस प्रशासनाला सक्त आदेश

172
Jalna Maratha Andolan : लाठीमार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा; मुख्यमंत्री शिंदेनी दिले पोलिस प्रशासनाला सक्त आदेश

मराठा आरक्षणासाठी जालना (Jalna Maratha Andolan) जिल्ह्यातील अंतरवली येथे सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे सक्त निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रामाणिक भूमिका राज्य सरकारची आहे. फक्तं जनतेने शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले.

(हेही वाचा – Ajit Pawar : जोपर्यंत चंद्र – सुर्य आहेत तोपर्यंत मुंबई वेगळी कोणीच करु शकणार नाही – अजित पवार)

यासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या घटनेची (Jalna Maratha Andolan) जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतली आहे. मी या आंदोलनाच्या नेत्यांशी देखील संवाद साधला होता. त्यांच्या मुद्द्यांवर अधिकाऱ्यांकडून युद्धपातळीवर कार्यवाहीही सुरू असल्याचे सांगतानाच त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंतीही केली होती. मात्र आंदोलनावर ते ठाम राहिल्याने त्यांची प्रकृती खालावत होती. मात्र आज जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक त्यांना भेटायला गेले. त्यांची प्रकृती पाहून त्यांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी विनंती देखील त्यांनी केली.

मराठा समाजाला (Jalna Maratha Andolan) आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका राज्य शासनाची असून समाजाला न्याय देण्याची भावना आणि भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामूळे आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी बोलताना केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.