जालन्यासह राज्यभरात मराठा आंदोलनामध्ये जे काही गुन्हे नोंद झाले आहेत ते मागे घेण्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सर्वजण प्रयत्न करत आहेत, त्यामुळे जरांगे यांनी सरकारला थोडा वेळ द्यावा आणि आंदोलन मागे घ्यावं असा ठराव आज सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
तीन अधिकारी निलंबित
मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण देता येईल याची चाचपणी करण्यासाठी आणि सर्वांचे भूमिका समजून घेण्यासाठी आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. त्यामध्ये जरांगे यांनी मागणी केल्याप्रमाणे जालना घटनेला जबाबदार असलेल्या तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
काय झालं बैठकीत?
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना एसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सारथी आणि इतर सर्वच महामंडळांना समान निधी उपलब्ध करून देण्याविषयी निर्णय झाला.
Join Our WhatsApp Community