Jama Masjid च्या हिंसाचारात फरार कट्टरपंथींना पकडण्यासाठी पोलिसांकडून बक्षीस जाहीर

61
Jama Masjid च्या हिंसाचारात फरार कट्टरपंथींना पकडण्यासाठी पोलिसांकडून बक्षीस जाहीर
Jama Masjid च्या हिंसाचारात फरार कट्टरपंथींना पकडण्यासाठी पोलिसांकडून बक्षीस जाहीर

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) संभल (Sambhal) जिल्ह्यामध्ये शाही जामा मशिदीच्या (Jama Masjid) सर्वेक्षणादरम्यान दि. २४ नोव्हेंबर २०२४ रोजी हिंसाचाराची घटना घडली होती. या हिंसाचारात समावेश असलेल्या गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. त्यात संभल पोलिसांनी ७४ गुन्हेगारांचे पोस्टर लावत कट्टरपंथींची माहिती देणाऱ्यांना बक्षीस जाहीर केले आहे. आरोपींचे पोस्टर्स जामा मशिदीच्या (Jama Masjid) भिंतीवर लावण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी आणि चौकांमध्ये हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

( हेही वाचा : Champions Trophy 2025 : ‘बुमराह नसेल तरी फरक पडणार नाही,’ असं बीसीसीआयचे सचिव का म्हणाले?

संभलचे (Sambhal) पोलिस दि. २४ नोव्हेंबर रोजी संभलमध्ये (Sambhal) घडलेल्या हिंसक घटनेशी संबंधित ७४ गुन्हेगारांची ओळख पटवण्यात आली आहे. सीसीटीव्हीद्वारे त्याचा या घटनेमध्ये सहभाग आढळून आला, त्याची ओळख पटावी म्हणून त्याते पोस्टर्सही लावण्यात आले आहेत. पोस्टर्समध्ये दिसणारे ओळखून त्याची माहिती द्या, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. अशातच त्यांनी लोकांना हे फोटो ओळखण्याचे आणि जर त्यांना या गुन्हेगारांबाबत कसलीही माहिती असल्यास या प्रकरणाची माहिती पोलिसांनी देऊन बक्षीस मिळवण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, संबंधित माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली. तसेच त्यांना बक्षीस देणार असल्याचे ही प्रशासनाने सांगितले. त्यातच संभल (Sambhal) हिंसाचाराच्या तपासासाठी एसआयटी (SIT) पथकाने संभल पोलिसांनी घटनास्थळी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून इतर आरोपींची ओळख पटवली. परंतु काही दंगलखोर कट्टरपंथी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाले. (Sambhal)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.