जामिया मिलिया (Jamia Millia Islamia) विद्यापीठातून देशविरोधी कारनाम्यांना पाठिंबा नेहमीच दिला जातो. त्यातच सीएए कायद्याविरोधातील आंदोलनाला ५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दि.१५ डिसेंबर रोजी जामिया विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डाव्या विचारसरणीच्या संघटना ऑल इंडिया स्टुडेंट्स असोसिएशन (All India Students Association) आणि नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (NSUI) सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कथित विद्यार्थ्यांनी “तेरा मेरा रिश्ता क्या, ला इलाहा इल्लाल्लाह” आणि “हम क्या चाहते? आझादी.” अशा आशयाच्या घोषणा दिल्या.
( हेही वाचा : Priyanka Gandhi : बॅग व ती; आधी पॅलेस्टाईनचे समर्थन केले; नंतर बांगलादेशी अल्पसंख्यांकांचा कैवार घेऊन सावरले)
२०१९ साली सीएए (CAA) कायद्याविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाचा केंद्रबिंदू म्हणून जामिया मिलिया विद्यापीठाकडे पाहिले जाते. सीएए कायद्याबद्दल जाणीवपूर्वक गैरसमज पसरवून दिल्लीमध्ये वातारवण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात होता. या आंदोलनामध्ये जवळपास ५० जाणांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या बाजूला १०० जणं गंभीर जखमी झाली. त्यात ५ वर्षानंतर याच आंदोलानाला उजाळा देत, पुन्हा धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे. या कार्यक्रमाचे रूपांतर आंदोलनात झाले आणि अशातच कॉलेजच्या प्रशासनाने कँटीन आणि वाचनालय तातपुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.(Jamia Millia Islamia)
दिल्ली पोलिसांच्या विरोधात केली घोषणाबाजी!
दरम्यान आंदोलनाचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विद्यार्थी आंदोलन करीत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये म्हणून दिल्ली पोलिसांची एक तुकडी परिसराबाहेर तैनात ठेवण्यात आली होती. परंतु आंदोलन कर्त्यांनी मनमानी कारभार करत पोलिसांच्या विरोधातच घोषणाबाजी सुरू केली. तसेच हिंदूंच्या (Hindu) विरोधात झालेल्या या दंगलीचा ‘उत्सव’ अशा प्रकारे साजरा करण्यात आल्याने प्रश्न निर्माण होत आहे. (Jamia Millia Islamia)
हेही पाहा :