Jammu and Kashmir : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला उत्साहात सुुरुवात

146
Jammu and Kashmir : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला उत्साहात सुुरुवात
Jammu and Kashmir : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला उत्साहात सुुरुवात

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी आज, बुधवारी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. यात राज्यातील 27 जगांवर सकाळी 9 वाजेपर्यंत 11.11 टक्के मतदानाची नोंद झाली. तर सकाळी 11 वाजेपर्यंत हे प्रमाण सुमारे 14 टक्के झाल्याचे निदर्शनास आले. (Jammu and Kashmir)

राज्यात तब्बल 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. जम्मू विभागातील 3 जिल्ह्यांतील आणि काश्मीर खोऱ्यातील 24 जागांवर मतदान सुरू असून 90 अपक्षांसह 219 उमेदवार मैदानात असून 23 लाखांहून अधिक मतदाते या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत. राजकीय पक्षांबरोबरच मतदारांमध्येही निवडणुकीसाठी मोठा उत्साह आहे. पहिल्या टप्प्यात ज्या जागांवर मतदान होणार आहे, त्या जागांवर काँग्रेस-एनसी आघाडी, पीडीपी आणि इतर अनेक पक्षांचे उमेदवार निवडणूक रंजक बनवत आहेत. (Jammu and Kashmir)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.