जम्मू व काश्मीर (Jammu and Kashmir Election) आणि हरियाणा (Haryana election) विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान प्रक्रिया आता संपली आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल आठ ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत. तत्पूर्वी (५ ऑक्टाेबर) सायंकाळी एक्झिट पोलचे (Exit Poll 2024) निकाल जाहीर झाले आहेत. जाणून घेवूया दोन्ही राज्यांमधील एक्झिट पोलचा कौल काय आहे. (Jammu Kashmir Election Exit Poll )
(हेही वाचा – सुदृढ आणि स्वच्छ समाज घडवण्यासाठी आध्यात्म आवश्यक – President Draupadi Murmu)
काय सांगते एक्जिट पोलची आकडेवारी?
दैनिक भास्कर : जम्मू-काश्मीरमध्ये भाजप २०-२५ जागा जिंकू शकते, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडी ३५-४० जागा जिंकू शकते, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) ४-७ जागा जिंकू शकते. तर इतर १२-१६ जागा जिंकू जागा मिळण्याची शक्यता आहे.
टाईम्स नाऊ : टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार, भाजपाला २८ ते ३० जागा, काँग्रेस-एन.सी.आघाडीला ३१ तो ३६ जागा, पीडीपीला जागा ५ ते ७, तर अपक्षांना ८ ते १६ जागा मिळण्याची शक्यता आहे.
इंडिया टीव्ही-CNX (सीएनएक्स) : इंडिया टीव्ही-CNX (सीएनएक्स) च्या एक्झिट पोलनुसार, भाजपाला २४ ते ३४ जागा, काँग्रेस-एन.सी. आघाडीला ३५ ते ४५ जागा, आणि पीडीपी तसेच अपक्षांना मिळून १६ ते २६ जागा मिळण्याची शक्यता आहे.
रिपब्लिक टीव्ही-पी मार्क : रिपब्लिक टीव्ही-पी मार्कच्या एक्झिट पोलनुसार, भाजपाला २८ ते ३० जागा, काँग्रेस-एन.सी. आघाडीला ३१ ते ३६ जागा, पीडीपीला ५ ते ७ जागा, तर अपक्षांना ८ ते १६ जागा मिळण्याची शक्यता आहे.
इंडिया टुडे-सी व्होटर्स : इंडिया टुडे-सी व्होटर्सच्या सर्वेनुसार काँग्रेस आणि एन.सी. आघाडीला ४० ते ४८ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपाला २७ ते ३२ जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय पीडीपीला ६ ते १२, तर अपक्षांना 6 ते 11 जागा मिळण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – BJP च्या उमेदवार निवड प्रक्रियेबाबत पक्षातच नाराजीचा सूर!)
2014 मध्ये एक्झिट पोलने काय भाकीत केले होते?
2014 मध्ये झालेल्या शेवटच्या विधानसभा निवडणुकीत, एक्झिट पोलने त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तवला होता, तर लोकांच्या निकालाने पीडीपीला भाजप, एनसी आणि काँग्रेसवर विजय मिळवून दिला होता. CVoter एक्झिट पोलने अंदाज वर्तवला होता की, 87 सदस्यीय सभागृहात कोणताही पक्ष 44 जागांचा बहुमताचा आकडा पार करू शकणार नाही. CVoter एक्झिट पोलने म्हटले आहे की पीडीपीला 32-38 जागा मिळतील, त्यानंतर भाजपला 27-33, NC 8-14 आणि काँग्रेसला 4-10 जागा मिळतील. निवडणुकीचे निकाल जाहीर झाले तेव्हा पीडीपीला 28, भाजपला 25, एनसीला 15 आणि काँग्रेसला 12 जागा मिळाल्या.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community