जावेद अख्तर हिंदूविरोधी, साहित्य संमेलनात बोलावू नका! ब्राम्हण महासंघाची भूमिका 

83

९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या ३, ४ आणि ५ डिसेंबर रोजी नाशिकमध्ये होणार आहे. नाशिकमधील भुजबळ नॉलेज सिटीमध्ये हे साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गीतकार जावेद अख्तर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मात्र ब्राह्मण महासंघातर्फे जावेद अख्तर यांच्या नावाला विरोध करण्यात आला आहे. जावेद अख्तर हे नेहमीच हिंदू धर्माच्या विरोधात बोलतात, लिहितात. अशा व्यक्तीला बोलावून साहित्य संमेलनाचे पदाधिकारी नेमका कोणता संदेश देऊ पाहत आहेत?, असा सवाल ब्राह्मण महासंघाने केला आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाला आणखी एक नवीन वाद चिकटला आहे.

अख्तर यांचे मराठी साहित्यात योगदान काय?

जावेद अख्तर आणि गुलजार यांचे मराठी नाट्य सृष्टीत काय योगदान आहे? वीर सावरकरांच्या भूमीत अख्तर कशासाठी?, असे प्रश्न दवे यांनी उपस्थित केले आहेत. ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून गीतकार जावेद अख्तर यांना निमंत्रित केल्यामुळे नवा वाद उफाळून आला आहे. ब्राह्मण महासंघाने अख्तर यांना विरोध केला आहे. जावेद अख्तर यांना संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याआधी अख्तर यांचे मराठी साहित्यासाठी काय योगदान आहे? याचे उत्तर संमेलन आयोजकांनी द्यावे, असे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले.

(हेही वाचा अबब…टोमॅटो १०० रुपये किलो! पेट्रोलच्या दरालाही टाकले मागे)

वीर सावरकरांच्या भूमीत अख्तर कशासाठी?

संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर यांच्यासारखे असताना वीर सावरकर यांच्या भूमीत अख्तर यांच्यासारख्या विकृतांना का बोलावण्यात येत आहे. अख्तर हे नेहमीच हिंदू धर्माच्या विरोधात बोलतात, लिहितात. अशा व्यक्तीला बोलावून साहित्य संमेलनाचे पदाधिकारी नेमका कोणता संदेश देऊ पाहत आहेत? दिब्रिटो असो की जावेद यांना ना हिंदू धर्माचे प्रेम ना त्याविषयी आदर. त्यामुळे या अशा या हिंदुविरोधी लोकांना अशा महत्वाच्या पदांचा सन्मान देऊ नये, अशी ब्राह्मण महासंघाची भूमिका आहे, असेही दवे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.