जयंत पाटील ब्रीच कँडीत दाखल! 

मंत्रिमंडळ बैठक सुरु असताना जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते स्वत: बैठकीतून बाहेर चालत आले आणि ब्रीच कँडी रुग्णालयाकडे जाण्यासाठी निघाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मंत्रिमंडळ बैठक सुरु असतानाच अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून हॉस्पिटलमध्ये रवाना झाले. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जयंत पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत सांगलीच्या पूरग्रस्त भागाचा दौरा करताना सोबत होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नुकसानीची माहिती देण्यात आली.

मंत्रिमंडळ बैठकीतून बाहेर पडले!

मंत्रिमंडळ बैठक सुरु असताना जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते स्वत: बैठकीतून बाहेर चालत आले आणि ब्रीच कँडी रुग्णालयाकडे जाण्यासाठी निघाले. अस्वस्थ वाटू लागल्याने जयंत पाटील रुग्णालयात दाखल झाले. ब्रीच कँडी रुग्णालयात जयंत पाटील यांच्यासोबत त्यांचा मुलगा आहे. सांगलीचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पूरस्थितीच्या काळात यंत्रणांना सूचना देत पाहणी केली होती. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्यामुळे नदीकाठची गावे आणि सांगली शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पाहणीसाठी रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले होते.

(हेही वाचा : आजोबांचे नातूही ऐकेना… आजोबांनी सांगूनही रोहित पवार पूरग्रस्त दौऱ्यावर)

अलमट्टी धरणाच्या विसर्गाबाबत कर्नाटकाशी होते संपर्कात

पावसाच्या आधीच जयंत पाटील हे कर्नाटकात जाऊन तेथील तत्कालीन मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्याशी चर्चा करून पावसाळ्यात अलमट्टी धरणातील पाण्याच्या निसर्गाचे नियोजन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे मागील आठवड्यात सांगलीत महापूर आला तरी त्याला अलमट्टी धरण कारणीभूत ठरले नव्हते. कारण धरणातील पाण्याचा विसर्ग नियोजनानुसार करण्यात येत होते. 2019 च्या महापुराची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी जयंत पाटील यांनी हे विशेष प्रयत्न केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here