जयंत पाटलांच्या डोक्यात जातीयवाद – गोपीचंद पडळकर यांचा आरोप

101

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी रविवार, ३ जुलै रोजी विशेष अधिवेशन घेण्यात आले, त्यामध्ये राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी बहुमताने झाली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचा उल्लेख आदिवासी म्हणून केल्यामुळे भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी टीका केली.

राष्ट्रवादीची परंपरा 

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविषयी जे बोलले त्यावरून त्यांची सत्ता गेली तरी त्यांचा आज गेला नाही. त्यांचा माजोर्डापणा जायला तयार नाही. सभागृहात चर्चा करत असताना उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी गेल्या २-अडीच वर्षांत खूप चांगले काम केले आहे. हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यांचा उल्लेख करताना जयंत पाटील यांनी त्यांच्या समाजाचा उल्लेख केला आहे. यावरून त्यांच्या डोक्यातून अजून जातीवाद जायला तयार नाही. आदिवासी समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, भटक्या विमुक्त समाज असेल, या समाजातून कोणी लोकप्रतिनिधी चांगले काम करत असेल, तरी त्या लोकांचा अपमान करणे, त्या लोकांच्या समाजाबद्दल बोलणे, अशी परंपरा या राष्ट्रवादीवाल्यांनी चालू ठेवली आहे. त्यामुळे जयंत पाटील यांचा जाहीर निषेध आहे. आम्हीच या राज्यात चांगले काम करू शकतो असे जे चित्र, बुडबुडा त्यांनी निर्माण केला आहे, ते लवकरच फुटल्याशिवाय राहणार नाही, असेही आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.

(हेही वाचा विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी १२ सदस्य गैरहजर, सर्वाधिक राष्ट्रवादीच्या आमदारांचा समावेश)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.