Jayant Patil ED : जयंत पाटील यांची ‘ईडी’ चौकशी; राष्ट्रवादीकडून आंदोलनाचा इशारा

मुंबई राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आणि ईडीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्ते घोषणा देत आंदोलन करणार आहेत.

230
Jayant Patil ED : जयंत पाटील यांची 'ईडी' चौकशी; राष्ट्रवादीकडून आंदोलनाचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil ED) यांना काही दिवसांपूर्वी ईडीकडून नोटीस बजावण्यात आली. त्यानुसार जयंत पाटील यांना सोमवार १५ मे रोजी चौकशीसाठी हजर राहावे लागणार होते; मात्र त्यांनी चौकशीला हजर राहण्याची तारीख वाढवून घेतली होती. त्यामुळे आता सोमवार २२ मे रोजी सकाळी ११ वाजता जयंत पाटील यांची चौकशी होणार आहे. जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून अनेकांनी मोठा आर्थिक गैरव्यवहार केला गेला असल्याचा आरोप होता.

(हेही वाचा – ‘उबाठा’ शिवसेनेचे पाकीटमारीत मोठे नाव; आशिष शेलारांचा हल्लाबोल)

दरम्यान, ईडीने नोटीस देऊन पाटील (Jayant Patil ED) यांची बदनामी चालविली असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीनेही आंदोलनाची तयारी केली आहे. सांगलीमध्ये पक्षाच्या दुसर्‍या फळीतील कार्यकर्ते राष्ट्रवादी कार्यालयासमोर आंदोलन करून ईडीच्या कारवाईचा आणि भाजपा सरकारचा निषेध करणार आहेत. यासाठी कार्यकर्त्यांनी शहर जिल्हा कार्यालयाजवळ जमावे, असे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी केले आहे. दरम्यान, इस्लामपूरमध्ये ईडी कारवाईचा (Jayant Patil ED) राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत निषेध करण्यात आला. या कारवाईच्या निषेधार्थ इस्लामपूर तहसील कचेरीसमोर ईडीचा जाहीर निषेध करून तहसीलदारांना निवेदन देण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

यंत्रणांचा गैरवापर केला जाताेय- छगन भुजबळ

ईडी, सीबीआय दहशतीचं वातावरण निर्माण करतेय, जयंत पाटलांच्या चौकशीत काहीही निष्पन्न होणार नाही, आम्ही आंदोलन करत राहू’ असे छगन भुजबळ यांनी म्हंटले आहे.

हेही पहा –

तसेच मुंबई राष्ट्रवादीच्या (Jayant Patil ED) कार्यालयाबाहेर आणि ईडीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्ते घोषणा देत आंदोलन करणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.