Jayant Patil : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस

मागील काही महिन्यांपासून देशातील अनेक बड्या नेत्यांवर वेगवेगळ्या प्रकारे कारवाई करण्यात आली आहे.

208
Jayant Patil
Jayant Patil : 'चौकशीसाठी वेळ वाढवून मिळावा'; जयंती पाटील यांची ईडीकडे मागणी

मागील काही महिन्यांपासून देशातील अनेक बड्या नेत्यांवर वेगवेगळ्या प्रकारे कारवाई करण्यात आली आहे. अशातच पुन्हा एकदा महाराष्ट्रातील नेत्याला ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आली आहे. जयंत पाटील यांना सोमवार १५ मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून अनेकांनी मोठा आर्थिक गैरव्यवहार केला गेला असल्याचा आरोप होता.

(हेही वाचा – Maharashtra Political crisis : शिंदे – फडणवीस सरकारच्या डोक्यावर टांगती तलवार; न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष)

या प्रकरणात सर्वप्रथम दिल्लीतील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती पाहता हे प्रकरण सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडे सोपवण्यात आले होते. (Jayant Patil)

हेही पहा –

यापूर्वी या प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही ईडीने चौकशी केली होती. जयंत पाटील (Jayant Patil) आता या सगळ्या प्रकाराला कसे सामोरे जातात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.