उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेससह अवघ्या राज्यात खळबळ माजली होती. यातच आता शरद पवारांचे विश्वासू मानले जाणारे जयंत पाटील हे सुद्धा अजित पवार गटात सामील होणार आहेत. यासंबंधीच्या हालचाली सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत.
अजित पवार गटातील मंत्री छगन भुजबळांनी शरद पवार आमचे विठ्ठल आहेत, पण त्यांना बडव्यांनी घेरल्याचा आरोप केला होता. त्यामुळे हे बडवे नेमके कोण याची चर्चा रंगली होती. यासंबंधी जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड या प्रमुख नेत्यांची नावे पुढे आली. पण आता अजित पवारांच्या गटाने जयंत पाटील यांनाच फोडून आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
(हेही वाचा – नवाब मलिकांचा तुरूंगातील मुक्काम वाढला; ‘या’ कारणामुळे जामीन देण्यास न्यायालयाचा नकार)
प्राथमिक टप्प्यातील झाली चर्चा
सूत्रांच्या माहितीनुसार, यासंबंधी अजित पवार गटाची जयंत पाटील यांच्याशी प्राथमिक टप्प्यातील चर्चा ही झाली आहे. पण पाटील यांनी या प्रयत्नांना अद्याप अपेक्षित सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. ते शरद पवारांसोबत राहण्याच्या मुद्यावर ठाम आहेत. त्यानंतरही जयंत पाटलांचे मन वळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवारांच्या बंडानंतर जयंत पाटील यांनीच शरद पवारांतर्फे त्यांची बाजू मांडली होती. सध्याही ते अजित पवार व त्यांच्या सर्थकांवर टीकेची झोड उठवण्यात अव्वल क्रमांकावर आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community