राज्याची विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे. त्यानंतर राज्यात नक्कीच महाविकास आघाडीचे सरकार येईल. त्यावेळी ज्यांचे संख्याबळ जास्त असेल त्या पक्षाचा मुख्यमंत्री बनेल. जर संख्याबळानुसार राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पद आले तर मुख्यमंत्री कुणाला बनवायचे हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ठरवतील, शरद पवारांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असेल, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
भाजपचा पराभव नक्की
अलीकडे विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत आमचे उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत पदवीधर आणि शिक्षकांनी मतदान केले. म्हणजेच राज्यातील सुशिक्षित मतदार महाविकास आघाडीच्या पाठिशी आहे. त्यामुळे आम्ही एकत्र असलो तर भाजपचा पराभव नक्कीच असणार आहे. आगामी विधासभा निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त ६० जागा मिळतील. भाजपकडे मोदींच्या नावाशिवाय काहीच नाही. परंतु राज्यात जे काही सुरु आहे, त्याबद्दल जनतेच्या मनात चिड आहे. हा राग मतपेटीतून उतरणार असून महाविकास आघाडी सत्तेवर येईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
(हेही वाचा भारत स्वतंत्र, पण मंदिरे पारतंत्र्यात!)
Join Our WhatsApp Community