अजित पवार यांची मोठी खेळी; जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी

237
अजित पवार यांच्याकडून जयंत पाटील यांची हकालपट्टी

महाराष्ट्राच्या राजकारणात २ जुलै २०२३ हा दिवस फार मोठ्या घडामोडींमुळे महत्वाचा ठरला. रविवार २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार तसेच त्यांच्या ८ सहकाऱ्यांनी रविवार (२ जून) युती सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांच्याकडून जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. पत्रकार परिषद घेऊन प्रफुल्ल पटेल यांनी याची माहिती दिली.

यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारणीची घोषणा केली आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विधीमंडळाच्या गटनेतेपदी अजित पवार तर प्रतोदपदी अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. एकीकडे शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना बडतर्फ केलं आहे. तर दुसरीकडे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नियुक्ती केली आहे.

(हेही वाचा – प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे राष्ट्रवादीतून बडतर्फ; शरद पवार यांची कारवाई)

यावेळी युवक प्रदेशाध्यक्षपदी सुरज चव्हाण तर महिला प्रदेशाध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली आहे. मात्र शरद पवार हेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राहणार असल्याचं अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं.

विरोधी पक्षनेता निवडीवरून प्रश्न विचारला असता, “विरोधी पक्षनेता निवडण्याचं काम हे विधानसभेच्या अध्यक्षांचे आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांकडे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर आम्ही रविवारीच अपात्रतेची कारवाई करण्याचं पत्र दिलं असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.